सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण ,राजकीय वातावरण तर तापताना दिसत आहे.मात्र दुसरीकडे कमी पावामुळे यंदा उन्हाळा चांगल्याच प्रमाणात जाणवत असून राज्यात आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.उष्माघातामुळे ३३ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रतीक्षा असते की, आंबे केव्हा खायला मिळणार. त्यात पण अनेकांना खरा हापूस आंबा मिळणार का ? असा प्रश्न पडलेला असतो. पण आता हे संपूर्ण टेन्शन घायची गरज नाही. कारण देवगडचा हापूस आंबा आता तुम्हाला घरपोच मिळणार आहे तेही पोस्टाने.
चंद्रपुर येथील चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी निवडणुकीत विजय झाल्यास दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे विचित्र आश्वासन दिले आहे. याचीच चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत सुप्रिया सुळे यांचे नाव असल्याने आता पवार विरुद्ध पवार लढत होणार आहे.
भिवंडी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागाली होती. हि घटना शनिवारी रात्री घडली असून आग पूर्णतः विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव पहिल्या यादीत नाही.
लोकसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली असून अनेक सेलिब्रिटी पक्ष प्रवेश करत असून अनेकांना उमेदवारी देखील जाहीर होत आहे. यातच आपल्या सगळ्यांचा लाडका गोविंदाने शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पहिल्यांदा मासिक पाळीचा सामना करताना आलेल्या नैराश्यातून मलाड येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरंच मासिक पाळीचा त्रास होतो का ? त्रासामागील नेमकं कारण काय जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
बीडमधील अंबाजोगाई येथे खोदकाम करत असताना दोन मंदिरांचे अवशेष पुरातत्व विभागाला सापडले आहेत. याबद्दलची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य काही बड्या नेत्यांच्या नावे आहेत.