उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली असून ही मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे. काँग्रेसला लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणणार आहे.
बीडमध्ये दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर निशाणा साधला आहे.
अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज उदयनराजे उतरणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आली आहे.
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने झोडपले आहे.
जालना शहरातील अंबड रोडवरील कांचननगर येथील फोटो स्टुडिओशेजारी तब्बल 176 मतदार ओळखपत्र बेवारस अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळली.
नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर मोदींनी दिली आहे.
तब्बल 11 वर्षांनी आज डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.