Kokate Vs Pawar Rummy Video Controversy : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत रमी खेळल्याचा आरोप फेटाळला असून ते युट्यूबवर विधानसभेचे कामकाज पाहत असताना जंगली रमीची जाहिरात आल्याचे स्पष्ट केले आहे.
Dhananjay Munde : २०० दिवसांच्या मौनव्रतानंतर धनंजय मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीच्या 'निर्धार मेळाव्यात' आपलं मौन सोडलं. विरोधकांवर शायरीच्या माध्यमातून हल्लाबोल करत त्यांनी बीड जिल्ह्याची बदनामी करण्याचा आरोप केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेगाव बुद्रुक येथे मुलाने आपल्या वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुलाब पत्रुजी दातारकर यांचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी मुलगा अभय दातारकर याला अटक केली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केल्याने वाद निर्माण झाला आहे.
कोकण किनारपट्टीसह इतर ठिकाणी पाऊस काही प्रमाणात थांबला असला तरी आज ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेने गणेशोत्सव २०२५ साठी ११ विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे येथून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी १२५ फेऱ्या उपलब्ध असतील. बुकिंग २५ जुलै २०२५ पासून सुरू होईल.
Weather Alert: महाराष्ट्रात 20 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भाषावादावरून राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या धमकीवरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Manoj Tiwari on Raj Thackeray : मीरा भाईंदरमधील राज ठाकरे यांच्या सभेवर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांचे मराठी प्रेम हे फक्त निवडणुकीपुरतेच असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपने सर्व पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांना फलक, बॅनर न लावण्याचे आणि वृत्तपत्रे किंवा टेलिव्हिजनवर जाहिराती न प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. मदत निधीत योगदान देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Maharashtra