Weather Alert: महाराष्ट्रात 20 जुलै रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे आणि आता 20 जुलै रोजीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Scroll to load tweet…

मुंबई आणि कोकण परिसर

मुंबई शहर आणि उपनगर: आकाश ढगाळ राहील, आणि हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, तुरळ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ताकद

पुणे, सातारा, कोल्हापूर (घाट क्षेत्र): जोरदार पावसाची शक्यता.

सातारा, सांगली, सोलापूर: यलो अलर्टसह पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा.

उत्तर महाराष्ट्र, विजांचा कडकडाट

नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर, धुळे: तुरळ ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता.

मराठवाडा क्षेत्रातही पावसाची चाहूल

संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव,

बीड: विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज.

विदर्भात मुसळधार पाऊस, सर्व 11 जिल्ह्यांना अलर्ट

नागपूर, अमरावतीसह संपूर्ण विदर्भ: हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा आहे.

महत्त्वाची सूचना

सर्व नागरिकांनी हवामान विभागाच्या अलर्टकडे गांभीर्याने पाहावे. शेतकऱ्यांनी पीक संरक्षक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर जाणे टाळावे.