महाराष्ट्र विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Maharashtra: महाराष्ट्र विधिमंडळापेक्षा पावसाळी अधिवेशन यावेळी वेगळ्या मुद्यांनी चर्चेत आले आहे. विधानभवनात झालेली मारामारी, वादविवादाने हे अधिवेशन ढवळून निघाले आहे. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमुळे परत एकदा ते चर्चेत आले आहेत. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात जंगली रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे.

कृषिमंत्री मोबाईल गेमवर खेळतानाचा व्हिडीओ झाला व्हायरल 

कृषिमंत्री कोकाटे हे मोबाईलवर गेम खेळत असतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असतान कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी, असा टोलाही त्यांनी लावला आहे.

Scroll to load tweet…

रोहित पवार यांनी केली मागणी

एकीकडे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. कर्जमाफी, शेतीमालाला भाव देण्याच्या मागणीकरिता शेतकरी बांधव रस्त्यावर उतरत आहेत. अशातच राज्याचे कृषिमंत्री विधिमंडळ अधिवेशनात पत्त्यांचा डाव मांडतात, हे अत्यंत असंवेदनशील आहे, अशी टीका करत विरोधक आक्रमक झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असं रोहित पवार यांनी मागणी केली आहे.