सार

Pune: पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील मेणबत्तीच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून अग्नीशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे.

Candle Factory Fire in Pune : पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला शुक्रवारी (8 डिसेंबर, 2023) आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. ही आग एवढी भीषण होती की, संपूर्ण कारखाना यामध्ये जळून खाक झाला आहे.आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या गोदामाला आग लागली. यामुळे गोदामातील सर्व सामान जळून खाक झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. कारखान्यामध्ये तपास सुरू आहे. त्याचसोबत कारखान्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारच्या वेळेस मेणबत्तीच्या कारखान्यात आग लागल्याची घटना घडली. अद्याप या दुर्घटनेचे कारण समोर आलेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की, पिंपरी-चिंचवडमधील तलावडे परिसरात मेणबत्ती कारखान्याला आग लागली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती देताना म्हटले की, सहा जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर आठ लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याचेही घनवट यांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वाढदिवसासाठी लागणाऱ्या मेणबत्त्या या कारखान्यात तयार करण्याचे काम केले जाते. गोदामात ठेवण्यात आलेल्या मेणबत्त्यांना आग लागली आणि ही भीषण दुर्घटना घडली.

आणखी वाचा: 

Four Year Old Girl Died : 4 वर्षांच्या चिमुकलीचा खिडकीतून पडून मृत्यू, लेकीला घरात एकटे ठेवण्याचा निर्णय

Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता

Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास