- Home
- Maharashtra
- Mumbai Mhada Lottery 2025: घर घेण्याचं स्वप्न होणार साकार?, कोकण मंडळाच्या ५३५४ घरांच्या लॉटरीचे वेळापत्रक जाहीर; सोडत कधी ते जाणून घ्या
Mumbai Mhada Lottery 2025: घर घेण्याचं स्वप्न होणार साकार?, कोकण मंडळाच्या ५३५४ घरांच्या लॉटरीचे वेळापत्रक जाहीर; सोडत कधी ते जाणून घ्या
Mumbai Mhada Lottery 2025: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाने ठाणे, पालघर, सिंधुदुर्गमधील ५३५४ सदनिका व ७७ भूखंडांसाठी लॉटरीचे वेळापत्रक जाहीर केले. याची संगणकीय सोडत ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाण्यात होणार आहे.

स्वस्त घरांची मोठी लॉटरी जाहीर
Mumbai Mhada Lottery 2025: म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमधील ५३५४ सदनिकांसाठीच्या लॉटरीचे अद्ययावत वेळापत्रक जाहीर केले आहे. संगणकीय सोडत येत्या ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
संगणकीय सोडतीचे वेळापत्रक जाहीर
सोडतीची तारीख: ११ ऑक्टोबर २०२५
स्थळ: डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
वेळ: जाहीर लवकरच
या लॉटरीसाठी एकूण ५,३५४ सदनिका आणि ७७ भूखंड उपलब्ध असून, कोकण विभागातील ठाणे, वसई, बदलापूर, सिंधुदुर्ग (ओरोस) या भागांतील विविध गृहनिर्माण योजनांचा समावेश आहे.
प्रक्रिया कशी असेल?
प्रारूप यादी: १ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in
) प्रसिद्ध होईल.
दावे व हरकती: १ ते ३ ऑक्टोबर २०२५, सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाइन करता येतील.
अंतिम यादी: ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल.
सोडतीतील यशस्वी अर्जदारांची नावे: ११ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर होतील.
लॉटरीतील उपलब्ध सदनिका आणि भूखंडांचे वर्गीकरण
सदर सोडत ५ घटकांमध्ये विभागली गेली आहे.
२०% सर्वसमावेशक योजना – ५६५ सदनिका
१५% एकात्मिक शहर गृहनिर्माण योजना – ३००२ सदनिका
म्हाडा कोकण मंडळ योजना (विखुरलेल्या सदनिका) – १७४६ सदनिका
५०% परवडणाऱ्या घरांसाठी विशेष योजना – ४१ सदनिका
भूखंड विक्री योजना (बदलापूर आणि ओरोस) – ७७ भूखंड
भरघोस प्रतिसाद, अर्जांची संख्या लाखांच्या घरात
या लॉटरीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला असून
एकूण अर्ज प्राप्त: १,८४,९९४
अनामत रकमेसह वैध अर्ज: १,५८,४२४
थोडक्यात काय?
म्हाडा कोकण मंडळाची २०२५ ची ही लॉटरी म्हणजे मध्यमवर्गीयांसाठी घर घेण्याची मोठी संधी आहे. पात्र अर्जदारांसाठी संगणकीय पद्धतीने पारदर्शक सोडत ११ ऑक्टोबरला होणार आहे. तुम्ही अर्ज केले असल्यास संकेतस्थळावर वेळोवेळी यादी तपासत राहा!

