Mukhymantri Tirth Darshan Yojana: महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत, पात्र ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी ३०,००० रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य दिले जाईल. 

Mukhymantri Tirth Darshan Yojana: उतारवयात देवाची ओढ लागते, पण आर्थिक ओढाताण आड येते. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' अधिक प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे आता खिशाला एक रुपयाचाही भार न लावता देशातील ७३ आणि राज्यातील ६६ महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेता येणार आहे. काय आहे ही योजना आणि तुम्ही याचा लाभ कसा घेऊ शकता? पहा सविस्तर माहिती.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

खर्चाची चिंता सोडा, सरकार करणार मदत!

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रवासासाठी ३०,००० रुपयांपर्यंतचे आर्थिक पाठबळ मिळणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असेल

प्रवास: रेल्वे किंवा बसचा प्रवासाचा खर्च.

निवास: तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहण्याची सोय.

भोजन: प्रवासादरम्यानच्या जेवणाची व्यवस्था.

योजनेसाठी पात्रता निकष

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

वय: अर्जदाराचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

रहिवासी: अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रहिवासी असावा.

उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

वैद्यकीय प्रमाणपत्र: प्रवासासाठी शरीर साथ देईल, असे सरकारी डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

अर्जासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवा.

आधार कार्ड आणि रेशन कार्ड.

अधिवास प्रमाणपत्र (Domicile) किंवा जन्म दाखला.

उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार स्वाक्षरीत).

वैद्यकीय प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट).

पासपोर्ट साईज फोटो.

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन की ऑफलाईन?

ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी सरकारने अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे.

डिजिटल पर्याय: तुम्ही अधिकृत पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

सेतू केंद्र: ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, ते आपल्या जवळच्या 'सेतू सुविधा केंद्रात' जाऊन मोफत अर्ज भरू शकतात.

निवड कशी होणार?

अर्जांची छाननी केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीमार्फत निवड केली जाईल. जर अर्जांची संख्या जास्त असेल, तर 'कॉम्प्युटराईज्ड लॉटरी' द्वारे भाग्यवान लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

काही महत्त्वाचे नियम

प्रस्थान खर्च: घरापासून मुख्य रेल्वे स्थानक किंवा बस स्थानकापर्यंत पोहोचण्याचा खर्च स्वतः करावा लागेल.

एकच संधी: ज्यांची पूर्वी निवड झाली होती पण ते प्रवासाला गेले नाहीत, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही.

सुरक्षित प्रवास: या तीर्थयात्रेचे नियोजन IRCTC सारख्या नामांकित संस्थांमार्फत केले जाईल, ज्यामुळे ज्येष्ठांचा प्रवास सुरक्षित असेल.