- Home
- Maharashtra
- MSRTC Recruitment 2025: तरुणांसाठी सुवर्णसंधी!, एसटी महामंडळात 434 प्रशिक्षणार्थी पदांसाठी मेगा भरती
MSRTC Recruitment 2025: तरुणांसाठी सुवर्णसंधी!, एसटी महामंडळात 434 प्रशिक्षणार्थी पदांसाठी मेगा भरती
MSRTC Bharti 2025: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने 434 शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कोकण विभागातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील.

एसटीत 434 पदांसाठी मेगा भरती
MSRTC Bharti 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने 434 शिकाऊ उमेदवारांच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती कोकण विभागातील स्थानिक तरुणांना आणि चाकरमान्यांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून देणारी ठरणार आहे.
434 पदांसाठी मोठी भरती, कोणकोणती पदे?
रत्नागिरी विभागाच्या विविध कार्यशाळांमध्ये प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी ही भरती होणार आहे. खालील व्यवसायांमध्ये ही पदे उपलब्ध आहेत:
व्यवसायाचे नाव रिक्त पदे
यांत्रिक डिझेल 110 पदे
यांत्रिक मोटारगाडी 110 पदे
बीजतंत्री 60 पदे
पत्राकारागीर 44 पदे
सांधाता 25 पदे
कातारी 10 पदे
यंत्र कारागीर 10 पदे
रेफ्रिजरेशन अॅंड एअर कंडिशनिंग 5 पदे
साठा जोडारी 44 पदे
सुतार 4 पदे
रंगारी 10 पदे
शिवणकाम 2 पदे
अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आवश्यक
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे:
ऑनलाईन अर्ज: www.apprenticeshipindia.org या अधिकृत पोर्टलवर भरावा लागेल.
ऑफलाईन अर्ज: आवश्यक कागदपत्रांसह नमुना अर्ज भरून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत रत्नागिरी एसटी विभाग कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
महत्त्वाची टीप
भरतीसाठी कोणतीही वयोमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच, प्रत्येक उमेदवाराला एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल.
विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांचे आवाहन
भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना, विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी इच्छुक उमेदवारांना योग्यरित्या अर्ज भरण्याचे आणि अधिकृत जाहिरात वाचूनच पुढील पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

