सार

संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

“चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी वन नेशन-वन इलेक्शनबद्दल बोलतात. खोटारडे कुठले, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरण्याची भिती आहे, म्हणून जास्त वेळ हवा आहे. लाडक्या बहिण योजनेचा आणखी एक हफ्ता लाच म्हणून द्यायचा आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. लाडकी बहिण योजना टर्निंग पॉइंट ठरणार का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, “ही काही नवीन क्रांती केलेली नाही. याआधी सुद्धा महिलांसाठी अशा योजना आणल्या आहेत. फडणवीस, अजितदादा आणि मिंधे स्वत:च्या खिशातले 1500 रुपये देत नाहीयत. हा लोकांच्या कराचा पैसा आहे. आमच सरकार आले, तर आम्ही 3000 रुपये देऊ हा आमचा शब्द आहे” असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. माकडाच्या हाती मशाल दिली, तर तो काय करणार? याला शनिवारी संजय राऊत यांनी उत्तर दिले. “श्रीकांत शिंदेची डॉक्टरकीची सर्टिफिकेट तपासा, चोरलेला धनुष्यबाण लोकसभेला छातीवर पडला. रावणाची औलाद आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

‘बापाने नाक रगडलं, लाज वाटली पाहिजे, बेशर्म माणूस’: संजय राऊत

“श्रीकांत शिंदे माकडाचा मुलगा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरलाय त्यांनी. श्रीकांत शिंदेला लायकी नसताना, उद्धव ठाकरे यांनी खासदार बनवले. त्याचा बाप आलेला माझ्या मुलाकडे काम नाही. बेरोजगार आहे. डॉक्टरची डिग्री आहे, पण रुग्णालय चालवता येत नाही. मेडीकलच ज्ञान नाही. बापाने नाक रगडलं, लाज वाटली पाहिजे, बेशर्म माणूस” अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे.

आणखी वाचा:

महाराष्ट्रात 'परीक्षा' पुढे ढकलली?, अमोल कोल्हे यांचा सरकारवर गंभीर आरोप