Mira Road : मीरा रोडच्या नया नगरमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’

| Published : Jan 24 2024, 04:19 PM IST / Updated: Jan 24 2024, 04:21 PM IST

mumbai jcb

सार

Mira Road : मीरा रोडच्या नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकांमावर महापालिकेने मंगळवारी बुलडोझर चालवला. पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई करण्यात आली.

Mira Road : मीरा रोडमधील नया नगर परिसरामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बुलडोझर पॅटर्न’ राबवण्यात आला. सोमवारी (22 जानेवारी) झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

नेमके काय घडले?

अयोध्येतील श्री राम मंदिरातील रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मीरा रोडमधील नया नगर परिसरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत काही जण जखमी देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. 

यानंतर मंगळवारी (23 जानेवारी 2024) पोलीस बंदोबस्तामध्ये (Police Security) परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात (Unauthorized construction) कारवाई करण्यात आली. दुसरीकडे दगडफेक करणाऱ्यांचा शोधही सुरू करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजची मदत

श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करून अटकेची कारवाई केली गेली आहे.

 

आणखी वाचा : 

Lok Sabha Elections 2024 : या तारखेला होणार का लोकसभा निवडणुका? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले उत्तर

Ram Mandir Ayodhya: 'हनुमानजी स्वतः रामललांच्या दर्शनासाठी आले...', श्री राम मंदिरामध्ये नेमके काय घडले?

Alert! मधुमेह, खोकला-तापासह देशभरात तयार केलेल्या 70 औषधांचे नमुने आढळले निकृष्ट दर्जाचे, जाणून घ्या संपूर्ण यादी