Alert! मधुमेह, खोकला-तापासह देशभरात तयार केलेल्या 70 औषधांचे नमुने आढळले निकृष्ट दर्जाचे, जाणून घ्या संपूर्ण यादी

| Published : Jan 24 2024, 11:34 AM IST / Updated: Jan 24 2024, 12:39 PM IST

DRDO Covid Medicine
Alert! मधुमेह, खोकला-तापासह देशभरात तयार केलेल्या 70 औषधांचे नमुने आढळले निकृष्ट दर्जाचे, जाणून घ्या संपूर्ण यादी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Health News In Marathi : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) केलेल्या तपासणीमध्ये हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) 25 फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तयार केलेली औषधे आणि इंजेक्शन निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.

Health News In Marathi : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (Central Drugs Standard Control Organization) केलेल्या तपासणीमध्ये 70 हून अधिक औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) सर्वाधिक 25 फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तयार केलेली 40 औषधे आणि इंजेक्शन निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.

निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या यादीमध्ये दमा, ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, अ‍ॅलर्जी, खोकला, अँटी-बायोटिक्स, ब्राँकायटिस आणि गॅस्ट्रिक आजाराशी संबंधित औषधोपचारांमध्ये वापरली जाणारी औषधे तसेच इंजेक्शन्सचा समावेश आहे. याशिवाय कॅल्शियम सप्लिमेंट्ससह मल्टी व्हिटॅमिन औषधेही चाचणीमध्ये निकृष्ट असल्याचे आढळले.

डिसेंबर महिन्यामध्ये जारी करण्यात आला होता अ‍ॅलर्ट

दरम्यान सीडीएससीओने डिसेंबर (2023) महिन्यामध्येच यासंदर्भात अ‍ॅलर्ट जारी केला होता. याद्वारे ही धक्कादायक बाब समोर आली होती. निकृष्ट दर्जाची आढळलेली औषधे बद्दी, बरोटीवाला, नालागढ, सोलन, कालाअंब, पावंटा साहिब, संसारपूर टेरेस येथे असलेल्या औषधांच्या कंपन्यामध्ये तयार करण्यात आली आहेत. याशिवाय उत्तराखंड, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मुंबई, तेलंगणा, दिल्ली येथील फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तयार केलेले तब्बल 38 प्रकारच्या औषधांचे नमुनेही चाचणीत फेल ठरले आहेत. 

तपासणीमध्ये औषधे आढळली निकृष्ट दर्जाची

बद्दी येथील अलायन्स बायोटेक कंपनीने ‘हेपरिन सोडिअम’ इंजेक्शन तयार केले होते. या इंजेक्शनचे आठ नमुने तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाचे आढळले आहेत. हे इंजेक्शन रक्तामध्ये तयार होणाऱ्या गुठळ्याच्या आजारावरील औषधोपचारांमध्ये वापरण्यात येते. तर झाडमाजरी येथील कान्हा बायोजेनेटिक कंपनीने तयार करण्यात आलेल्या 'व्हिटॅमिन डी 3' गोळ्यांचे पाच नमुनेही चाचणीमध्ये फेल ठरले आहेत. सीडीएससीओने जारी केलेल्या अलर्टनुसार 22 फार्मास्युटिकल कंपन्यांची चौकशी सुरू आहे. यामध्ये अनेक कंपन्यांनी तयार केलेले औषधांचे नमुने सातत्याने निकृष्ट दर्जाचे आढळत आहेत.

एकूण किती औषधांच्या नमुन्यांची करण्यात आली चाचणी?

सीडीएससीओने जारी केलेल्या अ‍ॅलर्टनुसार, निकृष्ट दर्जाच्या घोषित केलेल्या औषधांच्या नमुन्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक औषधे हिमाचलमधील फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तयार करण्यात आल्याचे आढळले आहे. डिसेंबर महिन्यात सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने देशातील विविध शहरांमधून एकूण 1 हजार आठ (1,008) औषधांचे नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. यापैकी 78 औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले.

कोणकोणत्या शहरांमधून मागवण्यात आले होते औषधांचे नमुने?

हिमाचल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, सीडीएससीओ बद्दी, ऋषिकेश, गाझियाबाद, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, मुंबई, गाझियाबाद, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांमधून औषधांचे नमुने तपासणीसाठी जमा करण्यात आले होते. या सर्व नमुन्यांची सीडीएल लॅबमध्ये चाचणी करण्यात आली. यानंतर मंगळवारी यासंबंधीचा अहवाल जाहीर करण्यात आला.

आणखी वाचा :

चिनी न्यूमोनियाचा भारतात शिरकाव? कोलकातामधील 10 वर्षीय मुलीला Chinese Pneumoniaची लागण

दरवर्षी डिसेंबर महिन्यातच COVID-19चा नवा व्हेरिएंट का आढळतो? जाणून घ्या कारणे

Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती