MHADA Lottery 2025: म्हाडा नाशिकने ४७८ EWS घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ₹१८.५० लाखांपासून सुरू होणारी ही घरे गंगापूर, देवळाली, पाथर्डीसह विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. ४ सप्टेंबर २०२५ पासून ऑनलाईन अर्ज सुरू होतील.

नाशिक : नाशिकमध्ये घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल 478 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. ही सर्व घरे 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील (EWS) अर्जदारांसाठी उपलब्ध असणार आहेत.

घर कुठे आणि किती?

ही घरे नाशिकमधील गंगापूर शिवार, देवळाली, पाथर्डी, म्हसरुळ, नाशिक शिवार आणि आगर टाकळी या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. घरांची किंमत फक्त ₹18.50 लाखांपासून सुरू होते आणि सर्वात महागडं घर ₹27 लाखांपर्यंत आहे.

ऑनलाईन अर्ज कधीपासून?

अर्ज सुरू: 4 सप्टेंबर 2025, दुपारी 1:00 वाजता

शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत

अनामत रक्कम भरणा: 4 ऑक्टोबर 2025, संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत

अर्जदारांची अंतिम यादी: 17 ऑक्टोबर 2025, दुपारी 12:00 वाजता

सोडतीचा दिनांक व स्थळ: लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल

अर्ज कसा कराल?

सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in

या अधिकृत संकेतस्थळावर किंवा म्हाडा लॉटरी अ‍ॅपवरून अर्ज करावा.

महत्त्वाची सूचना

म्हाडाने कोणत्याही एजंट, सल्लागार किंवा प्रतिनिधीची नेमणूक केलेली नाही. म्हणून कोणीही तशी दावा करत असल्यास त्यांच्याशी व्यवहार करू नये, असा स्पष्ट इशारा म्हाडाकडून देण्यात आला आहे.

सदनिकांचे स्थाननिहाय वितरण

क्षेत्र सदनिका संख्येत

देवळाली शिवार 22

गंगापूर शिवार 50

पाथर्डी शिवार 64

म्हसरुळ शिवार 196

नाशिक शिवार 14

आगर टाकळी शिवार 132

अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक माहिती

संपूर्ण नियमावली, अटी, पात्रता आणि इतर तपशीलांसाठी माहिती पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करताना सर्व अटी काळजीपूर्वक वाचा आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असल्याची खात्री करा.

जर तुम्ही नाशिकमध्ये परवडणाऱ्या दरात घर खरेदी करू इच्छित असाल, तर MHADA लॉटरी 2025 ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेवर अर्ज करून आपले घराचे स्वप्न पूर्ण करा!