MHADA Lottery: छत्रपती संभाजीनगर म्हाडा योजनेअंतर्गत १,३२३ सदनिका आणि १८ भूखंडांची संगणकीय सोडत लवकरच होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

मुंबई : स्वस्त दरात आणि विश्वासार्हतेने ‘हक्काचं घर’ मिळवण्यासाठी म्हाडा (MHADA) ही लाखो घरांच्या स्वप्नांची पहिली पसंती आहे. आता छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेतून घर घेण्याची आणखी एक संधी निर्माण झाली आहे. योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 1,323 सदनिका आणि 18 भूखंडांची संगणकीय सोडत लवकरच होणार आहे.

मूळतः अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली असली, तरी गृहप्रेमींना आणखी वेळ मिळावी म्हणून म्हाडाने अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे. ही संधी शेवटची असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तीन प्रमुख योजना, विविध गटांचा समावेश

छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या विविध भागांमध्ये सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. ऑनलाईन संगणकीय सोडतीद्वारे ही घरे व भूखंड वितरित केले जाणार असून, ही योजना तीन प्रमुख भागांमध्ये विभागली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): 1,148 सदनिका

म्हाडा गृहनिर्माण योजना: 154 सदनिका

20% सर्वसमावेशक योजना: 21 सदनिका आणि 18 भूखंड

ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू, अंतिम संधी गमावू नका!

म्हाडाच्या एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली व मोबाईल ॲपच्या माध्यमातून अर्ज नोंदणी व सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

1,323 घरं + 18 भूखंड; संगणकीय सोडतीद्वारे वाटप

31 ऑगस्ट 2025 अर्ज भरण्याची अंतिम मुदत

तीन योजनांतर्गत वेगवेगळ्या गटांसाठी संधी

अर्ज नोंदणीसाठी MHADA Portal आणि App उपलब्ध

तुमचंही 'हक्काचं घर' आता एका क्लिकवर!

जर तुम्ही स्वप्नातलं घर शोधत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. मुदतवाढ मिळालेली आहे, पण शेवटची संधी गमावू नका!