- Home
- Maharashtra
- Mahavistar AI App : शेतीत डिजिटल क्रांती! महाविस्तार एआय अॅप कसा वापरायचा?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mahavistar AI App : शेतीत डिजिटल क्रांती! महाविस्तार एआय अॅप कसा वापरायचा?, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Mahavistar AI App For Farmers : महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी 'महाविस्तार एआय अॅप' सुरू केले, जे पेरणीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन पुरवते. या अॅपमध्ये एआय चॅटबॉट, हवामान अंदाज, बाजारभाव, सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

‘महाविस्तार एआय अॅप’चा वापर कसा करायचा?
मुंबई : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्य कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य, वैज्ञानिक आणि तात्काळ मार्गदर्शन मिळावे यासाठी “महाविस्तार एआय अॅप” अधिकृतरीत्या सुरू करण्यात आले आहे. घरबसल्या केवळ एका क्लिकवर संपूर्ण कृषीविषयक माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
संपूर्ण शेती माहिती एका ठिकाणी
महाविस्तार एआय अॅपमध्ये आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध आहे. त्यात खालील सुविधा देण्यात आल्या आहेत.
दैनिक आणि साप्ताहिक हवामान अंदाज
पिकनिहाय वैज्ञानिक सल्ला
खतांच्या अचूक डोसमधील मार्गदर्शन
कीड व रोगांची ओळख + नियंत्रणाची उपाययोजना
बाजारभावांचे अद्ययावत अपडेट
राज्य व केंद्र सरकारच्या कृषी योजनांची सविस्तर माहिती
या सर्व गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर मिळाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि निर्णय अधिक वेगवान व तर्कशुद्ध होतो.
एआय तंत्रज्ञानामुळे मिळणार त्वरित मदत
डिजिटल युगात अनेक क्षेत्रांत एआयचा वापर वाढत असताना, कृषी विभागानेही नव्या तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब केला आहे. अॅपमधील एआय-चॅटबॉक्स हे विशेष आकर्षण ठरत आहे.
शेतकऱ्यांना अचानक पडणारे प्रश्न
फवारणीचे प्रमाण
खतांचा योग्य वापर
पिकांची वाढ
रोगनियंत्रण उपाय
यांसारख्या queries चे एआय लगेच उत्तर देतो. वेळीच मिळालेल्या सल्ल्यामुळे त्रुटी कमी होतात आणि उत्पादनात वाढ होते. त्यामुळे हे अॅप खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा डिजिटल सल्लागार ठरणार आहे.
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान कमी करण्यास मदत
पाऊस, तापमानातील अनियमितता, वादळे, दुष्काळ यांसारख्या बदलत्या हवामानामुळे शेती धोक्यात येते. महाविस्तार अॅपमध्ये मिळणाऱ्या
हवामान अलर्ट
तात्काळ रोगनियंत्रण पद्धती
तज्ज्ञांचा योग्य सल्ला
यांमुळे शेतकऱ्यांना पिकांचे होणारे नुकसान कमी करण्यास मोठी मदत मिळते.
अॅप कसे वापरायचे?
महाविस्तार अॅप वापरण्यासाठी फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे.
फार्मर आयडीमध्ये पुढील माहिती नोंदवलेली असते.
शेतकऱ्याचे नाव व पत्ता
मोबाईल नंबर
आधार क्रमांक
बँक खाते तपशील
सातबारा उतारा
पिकांची माहिती
कर्ज व विमा योजनांचे रेकॉर्ड
ही सर्व माहिती एकत्रित असल्याने अॅप शेतकऱ्यांना अधिक अचूक, पारदर्शक आणि सुरक्षित सल्ला देऊ शकते.
फार्मर आयडी नसल्यास अॅपचा वापर करता येणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
महाविस्तार अॅप कसे डाउनलोड करायचे?
गुगल प्ले स्टोअरवर “Mahavistar AI” शोधा
अॅप मोफत डाउनलोड व इन्स्टॉल करा
मोबाइल नंबर व फार्मर आयडीने लॉगिन करा
आणि सुरू करा डिजिटल शेतीचा प्रवास!
हे अॅप आधुनिक शेती नियोजन, जोखीम कमी करणे, उत्पादन वाढवणे आणि तज्ज्ञांचा त्वरित सल्ला मिळवणे यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

