- Home
- Maharashtra
- Police Bharti 2025 : पुण्यात पोलीस व्हायचंय? २,००० पदांसाठी तब्बल २.२० लाख अर्ज, पुणे पोलीस मेगा भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी हे वाचा
Police Bharti 2025 : पुण्यात पोलीस व्हायचंय? २,००० पदांसाठी तब्बल २.२० लाख अर्ज, पुणे पोलीस मेगा भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी हे वाचा
Pune Police recruitment 2025 : पुणे शहर पोलीस दलाच्या २०२४-२५ च्या मेगा भरतीला तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. पोलीस शिपाई, वाहनचालक, बँडसमन आणि कारागृह शिपाई या एकूण २,००१ पदांसाठी तब्बल २,१९,९२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.

पुणे पोलीस दलात मेगा भरती
पुणे : पुणे शहर पोलीस दलात 2024-25 मधील सर्वात मोठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली असून यंदा तरुणांकडून अपेक्षेपेक्षा खूपच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ दोन हजारांवर रिक्त पदांसाठी तब्बल २,१९,९२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पोलिस दलात सामील होण्यासाठी तरुणाईत किती उत्सुकता आहे, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
दोन हजार जागांसाठी २.२० लाख अर्जांचा पाऊस
या मेगा भरतीत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (वाहनचालक), बँडसमन आणि कारागृह शिपाई या विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. एकूण १,९०१ पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पार पडली असून अर्जांची संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे.
भरतीतील पदांचे तपशील
पोलीस शिपाई (Police Constable) : 1,733 पदे
पोलीस शिपाई (वाहनचालक) : 105 पदे
बँडसमन (Bandsman) : 33 पदे
कारागृह शिपाई (Jail Constable) : 130 पदे
एकूण पदे : 2,001
अर्जांच्या मुदतवाढीचा मोठा फायदा
या भरतीसाठी अर्जांची अंतिम तारीख सुरुवातीला 30 नोव्हेंबर होती.
मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ती 7 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
ही मुदतवाढ उमेदवारांसाठी वरदान ठरली आणि नोंदणीचा आकडा थेट २ लाखांवर पोहोचला.
राज्यातील भरती प्रक्रिया एकाच दिवशी
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर शहरांमध्ये भरती प्रक्रिया एकाच दिवशी, एकाच वेळेत राबवली जात आहे. यामुळे भरतीत पारदर्शकता आणि एकरूपता राखण्यास मदत झाली आहे.

