MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्र 'काश्मीर' होणार? उद्यापासून कडाक्याच्या थंडीचा हाहाकार; हवामान खात्याचा 'हा' इशारा नक्की वाचा!

महाराष्ट्र 'काश्मीर' होणार? उद्यापासून कडाक्याच्या थंडीचा हाहाकार; हवामान खात्याचा 'हा' इशारा नक्की वाचा!

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र झाली असून, नाशिकच्या निफाडमध्ये तापमान ५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात गारठा वाढला असून, मुंबई आणि कोकणातही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. 

2 Min read
Rameshwar Gavhane
Published : Dec 22 2025, 09:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी!
Image Credit : Generated by google gemini AI

महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी!

पुणे : महाराष्ट्रात थंडीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यातील अनेक भागांत तापमानात मोठी घट नोंदवली जात असून नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे अवघ्या 5 अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठ्याची तीव्रता कायम असून राज्यभर थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. 

28
23 डिसेंबरला राज्यभर तापमानात घट कायम
Image Credit : Gemini AI

23 डिसेंबरला राज्यभर तापमानात घट कायम

सोमवार, 23 डिसेंबर रोजीही राज्यातील सर्वच भागांत तापमानाचा पारा घसरलेला राहणार आहे. सकाळी धुके, थंड वारे आणि रात्री कडाक्याची थंडी असा हवामानाचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर झाला नाही ना? एका सोप्या ट्रिकने लगेच लागेल थांगपत्ता
Related image2
नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती
38
मुंबई आणि कोकणातही थंडीचा शिरकाव
Image Credit : X@IndianTechGuide

मुंबई आणि कोकणातही थंडीचा शिरकाव

मुंबईत आता हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे.

कमाल तापमान : 32 अंश सेल्सिअस

किमान तापमान : 14 अंश सेल्सिअस

दिवसभर हलकं धुके राहण्याची शक्यता असून कोकणातील इतर भागांतही अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

48
पश्चिम महाराष्ट्रात हुडहुडी कायम
Image Credit : Gemini AI

पश्चिम महाराष्ट्रात हुडहुडी कायम

पुणे आणि परिसरात थंडीचा जोर कायम आहे.

पुणे : कमाल 29°C | किमान 10°C

सकाळी धुके आणि दिवसभर अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. इतर शहरांतही तापमान घटल्याने नागरिकांना थंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. 

58
मराठवाड्यात गारठा वाढला
Image Credit : our own

मराठवाड्यात गारठा वाढला

मराठवाड्यातही थंडीचा प्रभाव अधिक जाणवतो आहे.

छत्रपती संभाजीनगर : कमाल 29°C | किमान 9°C

सकाळी धुके तर नंतर निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका कायम राहणार आहे. 

68
उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला
Image Credit : our own

उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला

उत्तर महाराष्ट्रात थंडीने उच्चांक गाठला आहे.

नाशिक : कमाल 27°C | किमान 7°C

दिवसभर धुक्याची शक्यता आहे.

अहिल्यानगर : 7°C

जळगाव : 10°C च्या खाली तापमान

निफाडमधील 5 अंश सेल्सिअस तापमानाने राज्यातील थंडीचा उच्चांक गाठला आहे. 

78
विदर्भातही गारठा कायम
Image Credit : Social Media

विदर्भातही गारठा कायम

विदर्भात सकाळी कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका असा दुहेरी अनुभव नागरिक घेत आहेत.

नागपूर : कमाल 29°C | किमान 9°C

निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. गोंदिया, नागपूरसह काही भागांत तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवण्यात आलं आहे. 

88
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
Image Credit : our own

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन

राज्यात तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे.

उबदार कपडे वापरा

थंडी जास्त असल्यास बाहेर जाणं टाळा

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या

हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गट–मनसेत जागावाटपाचा तिढा, राज ठाकरेंनी दिला स्पष्ट संदेश
Recommended image2
नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती
Recommended image3
Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; मुंबईत दाट धुके, पुण्यात प्रदूषणाचा धोका
Recommended image4
Ladki Bahin Yojana : नगर परिषद निकालाचा गुलाल उधळताच एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी!
Recommended image5
महाराष्ट्रात 'महायुती'चा झंझावात! नगरपरिषद निवडणुकीत भाजपची बाजी, मविआचा सुपडा साफ; पाहा २८८ नगराध्यक्षांची संपूर्ण यादी
Related Stories
Recommended image1
तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर झाला नाही ना? एका सोप्या ट्रिकने लगेच लागेल थांगपत्ता
Recommended image2
नगराध्यक्षांना किती मिळणार पगार, जाणून घ्या माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved