- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! बुधवारी वादळी पावसाचा इशारा, या 5 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट! बुधवारी वादळी पावसाचा इशारा, या 5 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला असून ५ नोव्हेंबरला ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली तर विदर्भात हवामान कोरडे राहील.

राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकट
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकट दाटले आहे. हवामान विभागाने 5 नोव्हेंबर रोजी पाच जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, तर 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, Light to Moderate rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 4, 2025
मुंबईत अधूनमधून हलका पाऊस
मुंबई आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज आहे.
कोकणात यलो अलर्ट
5 नोव्हेंबर: रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’
6 नोव्हेंबर: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा धोका
हवामान खात्याने सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी 5 नोव्हेंबर रोजी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
पुणे जिल्हा वगळता या चारही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील 2 ते 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
तर नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो.
मराठवाड्यात विखुरलेला पाऊस
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
तर परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे.
विदर्भात थंडीची चाहूल
विदर्भात मात्र आता पावसाने माघार घेतली आहे.
या भागात कोरडे हवामान राहणार असून कोणत्याही जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केलेला नाही.
हवामान विभागाच्या मते, 7 नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होऊन थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.