MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातून पावसाची एक्झिट नाहीच! 7 ऑक्टोबरला वादळी 'कमबॅक', 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रातून पावसाची एक्झिट नाहीच! 7 ऑक्टोबरला वादळी 'कमबॅक', 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Oct 06 2025, 08:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
Image Credit : social media

13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई: राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने केली आहे आणि हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पावसाची ही मालिकाही थांबण्याची शक्यता नाही. 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. परिणामी 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa, South Madhya Maharashtra and Marathwada.

— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 6, 2025 

28
कोकणात वाऱ्यांचा जोर; ठाणे, पालघर सतर्क!
Image Credit : Getty

कोकणात वाऱ्यांचा जोर; ठाणे, पालघर सतर्क!

कोकण विभागातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून ढगांच्या गडगडाटासह हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Articles

Related image1
ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची तारांबळ होणार!, १३ ऑक्टोबरपासून ST कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, काय आहेत मागण्या जाणून घ्या
Related image2
Maharashtra Govt Scheme : दिवाळीआधी सर्वसामान्यांसाठी निराशाजनक बातमी, शासनाची ही योजनाही बंद होणार?
38
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी
Image Credit : unsplash

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यांवर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

48
मराठवाड्यात वीज व वाऱ्यांचा इशारा
Image Credit : our own

मराठवाड्यात वीज व वाऱ्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि धाराशिवमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

58
उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
Image Credit : Getty

उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढू शकते. या भागांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

68
विदर्भात दोन भाग, कोरडे आणि ओले
Image Credit : Asianet News

विदर्भात दोन भाग, कोरडे आणि ओले

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसून हवामान स्वच्छ आणि ऊन पडलेले राहील.

तर दुसरीकडे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

78
शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचा सल्ला
Image Credit : X

शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचा सल्ला

हवामान विभागाने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुढील दोन दिवस अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांनी उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतात पाणी साचू देऊ नये.

विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडांखाली किंवा उघड्यावर थांबू नये. 

88
नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक
Image Credit : X

नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक

पाऊस अजून थांबलेला नाही. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये वादळी वातावरणाची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी हे हवामान अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. 

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर टँकर अपघातानंतरही कोंडी कायम; 32 तासांचा हाहाकार, सरकारकडून चौकशीचे आदेश
Recommended image2
Ration Card: रेशन कार्डमधून नाव कट झालंय? टेन्शन सोडा, ५ मिनिटांत घरबसल्या करा नवीन नोंदणी!
Recommended image3
Solapur ZP Election : मोहोळमध्ये शिंदेंचं धक्कादायक वक्तव्य; शिवसेनेच्या चिन्हावरील उमेदवारालाच मत देऊ नका!
Recommended image4
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार; नंदुरबारमध्ये 710 पुरुषांचे अर्ज बाद
Recommended image5
Mumbai Pune Expressway : 32 तासांनंतर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्यात यश; मुंबई–पुणे महामार्गावरील वाहतूक सुरळीत
Related Stories
Recommended image1
ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची तारांबळ होणार!, १३ ऑक्टोबरपासून ST कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, काय आहेत मागण्या जाणून घ्या
Recommended image2
Maharashtra Govt Scheme : दिवाळीआधी सर्वसामान्यांसाठी निराशाजनक बातमी, शासनाची ही योजनाही बंद होणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved