- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढणार
Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढणार
Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने २६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला. पुढील २४ तास महत्त्वाचे असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे ठरणार असून, हवामान विभागाने २६ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/PiDmKmSVqH— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 17, 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, मुसळधार पावसाचा इशारा
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह आणि ३० ते ४० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाचा जोर राहण्याची चिन्हं आहेत.
दक्षिण कोकणमध्ये पावसाचा कहर
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये भारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने या तिन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र – जोरदार वादळी पावसाची शक्यता
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार पाऊस या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र – घाटमाथ्यांवर विशेष खबरदारीची गरज
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा.
घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस होण्याची शक्यता.
मराठवाडा – पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.
विदर्भ – संपूर्ण भागात पावसाचा इशारा
विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
१८ ते २० सप्टेंबर – पावसाचा जोर कायम
१८ सप्टेंबर रोजी २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट,
तर १९ आणि २० सप्टेंबरलाही पावसाची स्थिती तीव्र राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासन यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

