MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • ST Bus Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन दर

ST Bus Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन दर

ST Bus Ticket Price Hike: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकीट दरात सुमारे 15% वाढ जाहीर केली. ही दरवाढ लालपरी, शिवशाही, शिवनेरीसह सर्व प्रकारच्या बसेसना लागू असून, वाढते खर्च हे यामागील प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Sep 17 2025, 04:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर
Image Credit : social media

एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर

मुंबई: महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 25 जानेवारी 2025 पासून जाहीर केली असली, तरी आता प्रत्यक्षात ती अंमलात आणली जात आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
सर्व प्रकारच्या बसेसवर दरवाढ लागू
Image Credit : social media

सर्व प्रकारच्या बसेसवर दरवाढ लागू

एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे की, ही दरवाढ केवळ लालपरीपुरती (साधी एसटी) मर्यादित नाही, तर शिवशाही, शिवनेरी, आणि शिवनेरी स्लीपर (AC बस) यांच्यावरही लागू केली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वच प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. 

Related Articles

Related image1
Sukanya Samriddhi Yojana 2025: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करायची?, जाणून घ्या फायदे आणि व्याजदर
Related image2
Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
36
नवीन तिकीट दर कसे असतील?
Image Credit : Getty

नवीन तिकीट दर कसे असतील?

साध्या एसटी बससाठी (लालपरी) – पहिल्या टप्प्यासाठी (6 किमी) तिकीट दर ₹10.05 पर्यंत वाढवण्यात आला आहे.

शिवशाही AC बससाठी – प्रति 6 किमी टप्प्यासाठी दर आता ₹16 झाला आहे.

शिवनेरी बसचे दर देखील लक्षणीय वाढले असून, उदाहरणार्थ पुणे ते मुंबई प्रवास आता अधिक महाग झाला आहे. 

46
दरवाढीमागील कारणे
Image Credit : social media

दरवाढीमागील कारणे

महामंडळाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दरम्यान, डिझेलच्या किंमती, कर्मचारी पगार, महागाई भत्ता, तसेच बस देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी महामंडळाला मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत होता. हाकीम समितीच्या शिफारशींनुसार ही दरवाढ मंजूर करण्यात आली असून, यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे.

56
प्रवाशांच्या प्रतिक्रिया
Image Credit : our own

प्रवाशांच्या प्रतिक्रिया

या दरवाढीमुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ बसणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अधिक फटका बसेल, कारण एसटी हेच त्यांच्यासाठी प्रमुख वाहतूक साधन आहे.

66
राजकीय पक्षांची भाडेवाढीवर तात्काळ मागे घेण्याची मागणी
Image Credit : others

राजकीय पक्षांची भाडेवाढीवर तात्काळ मागे घेण्याची मागणी

राजकीय पक्षांनी या भाडेवाढीवर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत म्हटले आहे की, एकीकडे महिलांना ५०% प्रवास सवलत दिली जाते, आणि दुसरीकडे सामान्य प्रवाशांवर भाडेवाढीचा भार टाकला जातो.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Reverse Waterfall: पाणी खाली नाही, वर उडतं! नाणेघाटचा 'उलटा धबधबा' आणि २००० वर्षांचा इतिहास
Recommended image2
Abhijeet Dipke : NDA मध्ये येण्याची ऑफर, पण महिन्याभरापूर्वी तर मी देशद्रोही होतो ना? अभिजीत दिपकेचा सवाल
Recommended image3
FDA Crackdown : शाळा-कॉलेजबाहेरच्या खाऊगल्ल्यांवर FDAचा वॉच, तुकाराम मुंढेंनी दिले कारवाईचे संकेत
Recommended image4
Pune Protest: पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
Recommended image5
Pune Accident: बावधनमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Related Stories
Recommended image1
Sukanya Samriddhi Yojana 2025: मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना सुरू करायची?, जाणून घ्या फायदे आणि व्याजदर
Recommended image2
Police Bharti 2025: राज्यात 15,000+ पोलीस भरती!, तुमच्या जिल्ह्यात किती जागा?; जाणून घ्या सविस्तर माहिती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved