- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: शुक्रवारी राज्यात पावसाचा धुमाकूळ, १५ जिल्ह्यांना 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट!
Maharashtra Rain Alert: शुक्रवारी राज्यात पावसाचा धुमाकूळ, १५ जिल्ह्यांना 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट!
Maharashtra Rain Alert: पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि नाशिकमध्ये 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

मुंबई : पुढील २४ तासांत महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून, हवामान विभागाने ५ सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/w0ef9ieq6M
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 4, 2025
'ऑरेंज अलर्ट' असलेली प्रमुख शहरे
कोकण: पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार असल्याने येथे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
'यलो अलर्ट' असलेली शहरे
कोकण: मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस अपेक्षित आहे.
उत्तर महाराष्ट्र: धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे विजांच्या वादळासह पावसाची शक्यता आहे.
इतर भागांची स्थिती
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मराठवाडा: परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ: या भागात मात्र पाऊस पडण्याची शक्यता नाही. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण असेल.
या बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, विशेषतः घाटमाथ्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावा.

