MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Unseasonal Rain Alert: महाराष्ट्र पावसाच्या छायेखाली! ३२ जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट'; २ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Unseasonal Rain Alert: महाराष्ट्र पावसाच्या छायेखाली! ३२ जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट'; २ एप्रिलला विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Unseasonal Rain Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'हाय अलर्ट' जारी केला. यापैकी ९ जिल्ह्यांत ऑरेंज तर २३ जिल्ह्यांत यलो अलर्ट असून, गारपिटीसह ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 01 2026, 09:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
महाराष्ट्र पावसाच्या छायेखाली! ३२ जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट
Image Credit : Generated by google gemini AI

महाराष्ट्र पावसाच्या छायेखाली! ३२ जिल्ह्यांमध्ये 'हाय अलर्ट

मुंबई: एप्रिलच्या सुरुवातीलाच वरुणराजाने महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री केली असून, अवकाळी पावसाचे संकट अधिक गडद झाले आहे. हवामान विभागाने (IMD) गुरुवारी, २ एप्रिल रोजी राज्यातील तब्बल ३२ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ९ जिल्ह्यांत 'ऑरेंज अलर्ट' तर २३ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला असून, गारपिटीसह ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
कुठे असेल पावसाचा जोर? (विभागनिहाय अंदाज)
Image Credit : Asianet News

कुठे असेल पावसाचा जोर? (विभागनिहाय अंदाज)

१. पश्चिम महाराष्ट्र: पुण्याला ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून, येथे ५० ते ६० किमी वेगाने वादळी वारे आणि जोरदार पाऊस होऊ शकतो. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये मध्यम पावसासह गारपिटीची शक्यता असल्याने 'यलो अलर्ट' दिला आहे. कोल्हापुरात मात्र पावसाचा जोर कमी असेल. 

Related Articles

Related image1
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!
Related image2
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ६ मोठे धमाके! SC आरक्षणापासून नद्यांच्या पुनरुज्जीवनापर्यंत; फडणवीस सरकारचे 'हे' महत्त्वाचे निर्णय
37
२. उत्तर महाराष्ट्र: ५ जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा
Image Credit : Asianet News

२. उत्तर महाराष्ट्र: ५ जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर (अहमदनगर) या पाचही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. येथे मेघगर्जनेसह तुफान पावसाची शक्यता आहे. 

47
३. मराठवाडा: शेतीवर संकट
Image Credit : social media

३. मराठवाडा: शेतीवर संकट

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' असून वाऱ्याचा वेग ५०-६० किमी राहील. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये 'यलो अलर्ट' असल्याने काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

57
४. विदर्भ: ११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
Image Credit : Gemini Ai

४. विदर्भ: ११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम या सर्व ११ जिल्ह्यांत ४०-५० किमी वेगाने वारे वाहतील. 

67
५. कोकण: मुंबईसह किनारपट्टीवर पावसाची हजेरी
Image Credit : social media

५. कोकण: मुंबईसह किनारपट्टीवर पावसाची हजेरी

ठाणे, रायगड आणि रत्नागिरीत 'यलो अलर्ट' असून वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर आणि सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. 

77
नागरिकांना आणि शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Image Credit : social media

नागरिकांना आणि शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

वीज पडण्यापासून सावध राहा: पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.

पिकांची सुरक्षा: काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवा.

पशुधनाची काळजी: वीज आणि वादळामुळे पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित गोठ्यात बांधा.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
मुंबई बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या
नाशिक बातम्या
कोल्हापूर बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(43.0 ov)97/5
AUSAUS
-
Day 2
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Yavatmal Crash : यवतमाळमध्ये भरधाव कारने शिक्षिकेला फरफटत नेले, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Recommended image2
Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं
Recommended image3
YCM Hospital Pune : पुण्यातील रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूममध्ये दारूची पार्टी, डॉक्टर निलंबित
Recommended image4
Human Egg Racket : ३० हजारांसाठी मानवी स्त्रीबीजांची विक्री? ४० महिलांच्या शोषणाप्रकरणी ईडीचे छापे
Recommended image5
Maharashtra Rain : राज्यातील १० जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट; पुणे, सोलापूरसह वादळी पावसाची शक्यता
Related Stories
Recommended image1
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!
Recommended image2
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ६ मोठे धमाके! SC आरक्षणापासून नद्यांच्या पुनरुज्जीवनापर्यंत; फडणवीस सरकारचे 'हे' महत्त्वाचे निर्णय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved