MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरला; मुंबईत दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरला; मुंबईत दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पावसानंतर बुधवारी जोर ओसरला. मुंबईत पुढील दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज असून तापमान वाढले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 18 2025, 11:13 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
राज्यात पावसाचा जोर ओसरला
Image Credit : ANI

राज्यात पावसाचा जोर ओसरला

मोसमी पावसाने गेले दोन-तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, तर काही भागांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी झाला आणि फक्त ठराविक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

24
विदर्भ- मराठवाड्यात पावसाची शक्यता
Image Credit : Getty

विदर्भ- मराठवाड्यात पावसाची शक्यता

विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यभर पावसाला पोषक वातावरण तयार झाले होते. मात्र हे क्षेत्र विरल्यानंतर आता मराठवाड्यावर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढणार
Related image2
ST Bus Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन दर
34
मुंबईत पावसाची विश्रांती
Image Credit : Getty

मुंबईत पावसाची विश्रांती

मुंबईत मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. शहर आणि उपनगरात हलक्या सरी पडल्यानंतर आत्तापर्यंत फारसा पाऊस झालेला नाही. पुढील दोन-तीन दिवस मुंबईतही पावसाची शक्यता कमी आहे. पावसाला ओढ बसल्यामुळे तापमानात पुन्हा वाढ झाली असून, बुधवारी कुलाबा केंद्रात २९.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ केंद्रात ३०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

44
शुक्रवारपासून आणखी घट
Image Credit : Getty

शुक्रवारपासून आणखी घट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून राज्यभर पावसाचा जोर आणखी कमी होणार आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी पडतील तर काही ठिकाणी अधूनमधून पाऊस होईल. मुसळधार पावसाची शक्यता मात्र कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून मंगळवारी आणखी काही भागांतून वाऱ्यांची माघार घेतली आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Raj Thackeray Speech: इराणचं समर्थन ते 'महाराष्ट्र नेक्स्ट'ची घोषणा! शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा कडक प्रहार; भाषणातील १० मोठे मुद्दे
Recommended image2
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रावर पुढील २४ तास पावसाचे सावट! 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह अवकाळीचा इशारा
Recommended image3
बळीराजाच्या चिंतेत वाढ! २०२६ मध्ये पुन्हा येणार 'एल निनो'; मान्सूनवर मोठं संकट, पाहा काय म्हणतोय स्कायमेटचा अहवाल?
Recommended image4
Gudi Padwa 2026:जेव्हा महिलांनी हाती घेतले ढोल-ताशे आणि तलवार, पाहा शोभायात्रेचा
Recommended image5
पुणे-मुंबई प्रवास आता 'विमानापेक्षा' फास्ट! फक्त ४८ मिनिटांत गाठणार ऑफिस; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पण नागपूरकरांचा खोळंबा?
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे! २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढणार
Recommended image2
ST Bus Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!; जाणून घ्या नवीन दर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved