- Home
- Maharashtra
- Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सांताक्रूझमध्ये २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, राज्यात मुसळधार पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस; रेड अलर्ट जारी, कोकण किनारपट्टीवर होणार चांगला पाऊस
महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस होत असून त्यामुळं लोकांची तारांबळ उडाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत असून काळजी घेण्याचं अवाहन केलं आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सक्रिय
दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
सांताक्रूझला चांगला पाऊस झाला
सांताक्रूझ येथे शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवारी सकाळी 8.30 दरम्यानच्या 24 तासांत 244.7 मिमी पावसाची नोंद झाली. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये 268.6 मिमी पावसाची नोंद झाली होती.
पाच वर्षांनी पाऊस झाला
पाच वर्षांनी शनिवारी २४ तासांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर राज्याभारत कोसळणाऱ्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह काही भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाऊस कोठे कोठे होणार?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस होणार
सुमारे 40 ते 50 किमी ताशीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.