- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, स्वातंत्र्यदिनी २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, स्वातंत्र्यदिनी २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. १५ ऑगस्ट रोजी राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनीही राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने एकूण २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Thunderstorm accompanied with lightning, heavy rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the ghat areas of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/UrwtlAJjhJ— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 14, 2025
कोकण आणि मुंबई
मुंबई शहरात मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये मात्र हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने तिथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ
विदर्भातही पावसाचे वातावरण राहणार आहे. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ येथेही वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाणा आणि वाशीम या दोन जिल्ह्यांत मात्र पावसाची शक्यता कमी असून, येथील हवामान साधारणपणे स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.
एकूणच, राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

