- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: मोठी बातमी! महाराष्ट्रात ३ ऑक्टोबरला वादळी पावसाची शक्यता, २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: मोठी बातमी! महाराष्ट्रात ३ ऑक्टोबरला वादळी पावसाची शक्यता, २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रामध्ये पावसाचे पुनरागमन झाले. हवामान विभागाने ३ ऑक्टोबरला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शुक्रवारसाठी २१ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
मुंबई: सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांना जोरदार पावसाने झोडपून काढल्यानंतर काही दिवसांची विश्रांती मिळाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हवामानाने करवट बदलली आहे! २ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून, ३ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांना या पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/i83ijB36iS— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 2, 2025
विभागानुसार ३ ऑक्टोबरचा हवामानाचा अंदाज
१. मुंबईसह कोकण किनारपट्टी
मुंबई, पालघर आणि ठाणे: येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग: या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
२. पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली: या भागांत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
सोलापूर: येथे मात्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
घाटमाथा परिसर: येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
३. मराठवाडा (६ जिल्ह्यांना यलो अलर्ट)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि जालना: या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद): या ६ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.
४. उत्तर महाराष्ट्र (३ जिल्ह्यांना यलो अलर्ट)
धुळे आणि नंदुरबार: येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर): या तीन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
५. विदर्भ (सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट)
विदर्भात पावसाचा जोर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे.
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे
एकंदरीत, ३ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे, नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

