- Home
- Maharashtra
- Manoj Jarange Patil: आता माघार नाही! मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्यात हुंकार, सरकारसमोर ८ ठोस मागण्या
Manoj Jarange Patil: आता माघार नाही! मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्यात हुंकार, सरकारसमोर ८ ठोस मागण्या
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडवरून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नव्या लढ्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारसमोर ओला दुष्काळ, नुकसानभरपाई आणि पीक विम्यासह ८ प्रमुख मागण्या ठेवत, 'आता माघार नाही' असा इशारा दिला आहे

आता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मनोज जरांगे पाटील सज्ज
नारायणगड, बीड: मराठा आरक्षणासाठी झगडलेले नेतृत्व आणि आता शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सज्ज झालेले मनोज जरांगे पाटील यांनी दसऱ्याच्या दिवशी नारायणगडवरून नव्या लढ्याचा नारा दिला "आता माघार नाही!" हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर घेतलेला हा पहिलाच दसरा मेळावा असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मेळाव्याकडे लागले होते. या वेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दैनंदिन संकटांवर बोट ठेवत सरकारसमोर ८ ठोस मागण्या मांडल्या.
जरांगे पाटील यांच्याकडून सरकारसमोर ठणकावलेल्या ८ प्रमुख मागण्या
१. मराठवाडा व शेजारील जिल्ह्यांत ओल्या दुष्काळाची त्वरित घोषणा करा
“दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर झाला नाही, तर आम्ही मागे हटणार नाही.”
२. प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ₹७०,००० नुकसानभरपाई द्या
“कॅश पिकं जळाली, नुकसान मोठं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे.”
जरांगे पाटील यांच्याकडून सरकारसमोर ठणकावलेल्या ८ प्रमुख मागण्या
३. ज्यांचं शेत वाहून गेलं नाही पण पिकं खराब झाली, त्यांनाही भरपाई मिळावी
सरसकट ₹७०,००० देण्याची मागणी.
४. नदीकाठी जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना ₹१.३० लाख नुकसानभरपाई द्या
जमीन, जनावरे, घर, भांडी, सोनं वाहून गेलेल्यांसाठी १००% पंचनाम्यावर भरपाई द्या.
जरांगे पाटील यांच्याकडून सरकारसमोर ठणकावलेल्या ८ प्रमुख मागण्या
५. ऊस दरातून होणारी कपात त्वरित थांबवा
“१५ रुपये कपात करण्याचं नियोजन आहे, पण त्यातील एक रुपयाही कापू नका.”
६. शेतीला नोकरीचा दर्जा द्या, छोट्या शेतकऱ्यांना महिन्याला ₹१०,००० द्या
१० एकरपेक्षा कमी शेती करणाऱ्यांसाठी थेट मासिक सवलत द्यावी.
जरांगे पाटील यांच्याकडून सरकारसमोर ठणकावलेल्या ८ प्रमुख मागण्या
७. पीक विम्यातील 'तीन ट्रिगर' प्रणाली हटवा
“ही अट शेतकऱ्यांसाठी अडथळा ठरते.”
८. सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लागू करा
कोणतीही अपवाद न ठेवता सर्वांपर्यंत लाभ पोहोचवा.
‘आता खरी लढाई शेतकऱ्यांसाठी’, जरांगे पाटलांचा निर्धार
मराठा आरक्षणाची लढाई जिंकून दाखवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी निर्णायक टप्प्यावर उभे आहेत. “हे सरकार डोळे झाकून चालणार असेल, तर आम्ही माघार घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

