सार
Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील ४ ते ५ दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.
Maharashtra Monsoon Update: राज्यात पुढील ४ ते ५ दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्राच्या आणखी काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कोकण मराठवाड्यात आता जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
राज्यात कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात सातारा तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने शेतकऱ्यांना दिला सल्ला
विदर्भ, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान शेतकरी बांधवांना सल्ला देण्यात येतो की भात रोपवाटिका, फळबागा व भाजीपाला पिकातून पाणी काढण्याची व्यवस्था करावी. मेघगर्जना, विजांचा कडकडाट लक्षात घेता सोसाट्याचा वारा वाहणार असून नव्याने लागवड केलेल्या फळबागा आणि भाजीपाला पिकाला काठीच्या, बांबूच्या सहाय्याने आधार द्यावे. जनावरांना गोठ्यात बांधावे.
आणखी वाचा :
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप, भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू तर 1200 पर्यटक अडकले