मृत्यूचं तांडव! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर

| Published : Oct 04 2023, 05:10 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:40 AM IST

32  people died in one day shankarrao chavan government hospital Nanded
मृत्यूचं तांडव! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू, धक्कादायक कारण समोर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

नांदेड (Nanded Government Hospital Death) जिल्ह्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुग्णांचा मृत्यू होण्यामागील धक्कादायक व गंभीर कारण समोर आले आहे.

 

Nanded Government Hospital Death News : नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूचं तांडव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विष्णूपुरी परिसरातील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये 48 तासांमध्ये तब्बल 31 रुग्णांचा (Nanded hospital death toll rises) मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये 12 ते 15 नवजात बालकांचा समावेश आहे. 

रविवारपर्यंत (1 ऑक्टोबर 2023) मृतांची संख्या 24 इतकी होती. यानंतर दुसऱ्या दिवशी (2 ऑक्टोबर 2023) मृतांची संख्या 31वर (Maharashtra hospital deaths) पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे औषधांच्या कमतरतेमुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले जाते आहे. या घटनेमुळे विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवजात बालकांचाही झाला मृत्यू

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Dr Shankarrao Chavan Government Medical College and Hospital in Nanded) घडलेली ही संतापजनक घटना समोर आल्यानंतर राज्य सरकारवर सर्वसामान्य जनतेपासून ते विरोधकांकडूनही चौफेर टीका होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात नवजात बालक तसंच वृद्धांचे मृत्यू होण्याच्या घटना कमी होताना दिसत नाहीयेत. औषधे आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत झाल्याचं धक्कादायक व गंभीर कारण समोर आल्याने सरकारवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठतेय. दरम्यान या प्रकारामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी फेटाळले आरोप

दुसरीकडे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे ( Dean Shyamrao Wakode) यांनी औषध व कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत. मृत पावलेले रुग्ण मधुमेह (Diabetes), मूत्रपिंड (Kidney Failure) किंवा यकृती निकामी होणे (Liver Failure) यासारख्या वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होते, असे सांगत त्यांनी रुग्णालयावरील आरोप फेटाळले. तसंच रुग्णालयात औषधे किंवा कर्मचाऱ्यांचीही कमतरता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रुग्णांच्या मृत्यूवरून राजकारण

या घटनेनंतर विरोधक राज्य सरकार व भाजपवर जोरदार निशाणा साधतआहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत राज्य सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याची टीका केली आहे. दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी घटनेची तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

 

 

 शौचायल रुग्णालयाच्या अधिष्ठातांना करायला लावले स्वच्छ  

दुसरीकडे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी घडलेल्या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी रुग्णालयास भेट दिली. यावेळेस येथील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदार पाटील यांनी चक्क रुग्णालयाचे डीन शामराव वाकोडे (Dr. Shyamrao Wakode) यांनाच शौचालय स्वच्छ करायला लावले. यावरून नवा वाद निर्माण झालाय. या प्रकरणी हेमंत पाटील (M.P hemant Patil) यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा : 

Four Year Old Girl Died : 4 वर्षांच्या चिमुकलीचा खिडकीतून पडून मृत्यू, लेकीला घरात एकटे ठेवण्याचा निर्णय पालकांना पडला महाग

Mumbai School Boy Death : पीटी क्लासमध्ये 13 वर्षीय विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू, पोलीस करताहेत तपास

Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता