Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता

| Published : Oct 06 2023, 12:57 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:30 AM IST

Mumbai_Goregaon_Fire
Goregaon Fire : गोरेगावमध्ये अग्नितांडव! 7 जणांचा होरपळून मृत्यू, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

मुंबईतील गोरेगाव (Goregaon Fire) परिसरात एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा (Mumbai Fire 7 died) मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

 

Mumbai | Goregaon fire News : मुंबईतील गोरेगाव येथे एका सात मजली इमारतीला शुक्रवारी (6 ऑक्टोबर 2023) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 51 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटलं जात आहे. 

मुंबईतील कोणत्या भागात घडली दुर्घटना? 

गोरेगावच्या पश्चिम भागातील एम.जी. रोड (MG Road In Goregaon) परिसरात असणाऱ्या जय भवानी (Jai Bhavani Building) नावाच्या इमारतीतील ही दुर्घटना आहे. इमारतीतील रहिवाशी साखर झोपेतच असताना ही घटना घडल्यानं त्यांना घराबाहेर पडून स्वतःचा जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. 

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.  दुर्घटनेतील जखमींना एचबीटी हॉस्पिटल (HBT Trauma Hospital) आणि कूपर हॉस्पिटलमध्ये (Cooper Hospital) दाखल करण्यात आले आहे.

अग्नितांडव कसे घडले?

रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंग परिसरातून स्फोटाचे आवाज ऐकू आले. त्यानंतर स्फोट होऊन आग लागली. येथील कपडे तसंच अन्य गोष्टींमुळे आग झपाट्यानं वाढत गेली. या दुर्घटनेत पार्किंगमधील कार आणि गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. दरम्यान हे अग्नितांडव नेमके कोणत्या कारणांमुळे घडले, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

आणखी वाचा

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर मांजरीचा ताबा, मुंबई पोलिसांनी शेअर केला VIDEO

विकृती! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, शरीरावर हातोड्याने केले वार

धक्कादायक! बदलापुरात ट्रेनच्या डब्याचा दरवाजा केला बंद, ऐन गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवर उडाला मोठा गोंधळ