- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ४८ तास धोक्याचे, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ४८ तास धोक्याचे, कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Alert: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, काही ठिकाणी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

मुंबई: पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात आणि कोकण किनारपट्टीवर हवामान अतिशय पावसाळी राहणार आहे. या हवामान बदलामुळे राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Thunderstorms accompanied with lightning, Light to moderate rainfall and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/5lDDfi8vfK— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 7, 2025
कोणत्या भागांत वाढणार पावसाचा जोर?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे, ज्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय, जोरदार वाऱ्यांची शक्यता
दक्षिण राजस्थानच्या परिसरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, समुद्रसपाटीपासून जवळपास ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ही हवामान प्रणाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा जैसलमेरपासून सुरू होऊन गुना, दामोह, पेंद्रा रोड, संबलपूर, गोपालपूर ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्र ते बंगाल उपसागर, हवामान बदलाचा प्रभाव
कोकण किनाऱ्यालगतच्या अरबी समुद्रापासून ते राजस्थानातील कमी दाब क्षेत्रापर्यंत हवामानात बदल घडवणारा कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
सावध रहा, हवामान विभागाचा इशारा
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. विशेषतः डोंगराळ भागात, नदीनाल्यांजवळ आणि दरडग्रस्त भागांत प्रवास करताना सतर्कता बाळगावी.

