सार
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी न आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचे जरांगे यांनी सांगितलं आहे. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनोज जरांगे यांनी केलेल्या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली आहे.
मनोज जरांगे यांनी एका जातीच्या आधारावर आपले उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम उमेदवारांसोबत मराठा उमेदवार उभे करणार असल्याची आधी माहिती दिली होती पण नंतर मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगितले. आता ते महायुतीचे उमेदवार पाडतात का, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
माघार घेण्याचे ३ कारणे जाणून घ्या -
मनोज जरांगे यांनी माघार घेण्याचे ३ कारणे जाणून घेतले असता नवीन माहिती समोर आली आहे. आमची मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चर्चा सुरु होती. आम्ही १४ उमेदवार निश्चित केले होते. मात्र इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही यादी आलेली नाही. मित्रपक्षांनी उमेदवारांची नावं न पाठवल्याने उमेदवार घोषित केले नाही. आम्हाला एकाच जातीच्या आधारावर लढणं शक्य नाही. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही. एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.