Pune : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या ६९ कार्यकर्त्यांवर भाजपने कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार संबंधितांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Pune : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर भाजपने पक्षशिस्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवणाऱ्या पुण्यातील ६९ कार्यकर्त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी; कठोर भूमिका

भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांना पुढील सहा वर्षे कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांविषयी कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम संदेश पक्षाने दिला आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार निर्णय

या संदर्भातील अधिकृत पत्रही समोर आले असून त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची सही आहे. पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात येत आहे. ही कारवाई तात्काळ लागू करण्यात येत असल्याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भविष्यातही कडक कारवाईचा इशारा

पक्षातील कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने भविष्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना शहराध्यक्षांनी दिली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक शिस्त अधिक बळकट करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.

निलंबित करण्यात आलेल्या ६९ जणांची यादी

1. श्री धनंजय जाधव

2. श्री चंद्रकांत पाटे

3. सौ. कादंबरी साळवी

4. श्री जितेंद्र टकले

5. श्री किशोर तरवडे

6. श्री अमोल बालवडकर

7. श्री सोमनाथ गुंड

8. सौ. मानसी सोमनाथ गुंड

9. सौ. अनिता तळाठी

10. सौ. पल्लवी गाडगीळ

11. श्री दत्ता भगत

12. श्री विनोद मोहिते

13. श्री रमेश भंडारी

14. श्री समाधान शिंदे

15. श्री मधुकर मुसळे

16. श्री प्रकाश डोरे

17. श्री बाळासाहेब सानवडे

18. सौ. मंजू वाघमारे

19. सौ. प्रीती वालकर

20. श्री संदीप लोणकर

21. सौ. स्मिता गायकवाड

22. श्री संतोष शिंदे

23. श्री युवराज कुञ्जेकर

24. श्री इफ्तियाज मोमीन

25. श्री अप्पणा दादावाडकर

26. श्री पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर

27. श्री अभिजीत उपाध्ये

28. सौ. छाया गवळी

29. श्री नवल कुसाळ

30. श्री समीर पठाण

31. श्री प्रणव मोरे

32. श्री योगेश सूर्यवंशी

33. सौ. अर्चना योगेश सूर्यवंशी

34. सौ. नलिनी मोरे

35. सौ. संगिता ठोसर

36. श्री अनिल मेमाणे

37. श्री नितीन मारकड

38. श्री सतीश मारकड

39. सौ. वर्षा मारकड

40. श्री रुपेश धुले

41. श्री बापू पोकळे

42. श्री किरण वाळुंज

43. श्री अमोल रायकर

44. श्री संदीप पोकळे

45. सौ. मोहिनी देवकर

46. श्री रितेश रासकर

47. श्री सचिन दशरथ दांगट

48. श्री सुरेंद्र कांबळे

49. श्री संदीप जन्हाड

50. सौ. सुनीता गलांडे

51. श्री किशोर वाघमारे

52. श्री विजय चौगुले

53. श्री अकबर पठाण

54. श्री राजू साखरे

55. सौ. ऐश्वर्या जाधव

56. श्री जितेंद्र जगताप

57. श्री प्रविण खेडकर

58. सौ. स्मिता खेडकर

59. सौ. उज्वला गोडे

60. श्री बाळासाहेब घोडके

61. श्री सुरेश धनगर

62. सौ. स्वाती धनगर

63. सौ. सुवर्णा भरेकर

64. सौ. पल्लवी केदारी

65. श्री राहुल रामे

66. श्री हरीष परदेशी

67. श्री बंडू जाधव

68. सौ. नीता थोरवे

69. श्री प्रीतम नागापुरे