सार
कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: सध्याच्या घडीला राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरु असून एकमेकांवर टीका टिप्पणी करणे सुरु झाले आहे. बरेच नेते आपल्या पूर्वीच्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एका नेत्याने त्यांची साथ सोडली आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
पत्र पाठवून राजीनाम्याचा घेतला निर्णय -
पक्षातील अनेक गोष्टींवर त्यांनी यावेळी बोट ठेवून हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. पक्षातील घाणेरड्या राजकारणामुळे व्यथित होऊन आपण राजीनामा देत आहे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभेत सचिन बसारे यांना उमेदवारी देताना आपणास विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत विजय साळवी यांनी राजीनामा दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
अपमानास्पद वागणुकीमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. पुढे बोलताना विनायक राऊत यांनी उमेदवारी देत असताना आपल्याशी खोटं बोललं गेल्याच म्हटले आहे.