सार

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढत असून, १८ तारखेला प्रचार संपणार आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते जास्तीत जास्त सभा घेत आहेत. राहुल गांधी दत्तापूर आणि चंद्रपूरमध्ये सभा घेणार आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणातील रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता मतदानाला कमी दिवस राहिलेले असताना प्रचार पटकन उरकून घ्यावा लागणार आहे. १८ तारखेला प्रचार संपणार असून त्यानंतर एक दिवसानानंतर लगेच मतदान होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष प्रचार करण्यात कुठेच कमी पडत नसल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शरद पवार, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा जास्तीत जास्त सभा घेण्याकडे भर दिसत आहे. 

आज कोणाच्या कोठे सभा हे जाणून घ्या -

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते श्री. राहुल गांधी यांची आज ( 16 नोव्हेंबर) दुपारू 12.30 वाजता दत्तापूर, धामणगाव रेल्वे, येथे जाहीर सभा होणार आहे. तर त्यानंतर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी ते चंद्रपूरमधील चिमूर येथील नागरिकांशी सभेतून संवाद साधणार आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस श्रीमती प्रियंका गांधी यांची आज शिर्डी तसेच कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.

प्रियंका गांधी या आज सकळी शिर्डीत येणार असून 11.30 च्या सुमारास त्या साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून त्यानंतर 12.15 च्या सुमारास त्यांची साकोरी ता. राहाता (शिर्डी विधानसभा) येथे जाहीर सभा होईल. संध्याकाळी 5 वाजता त्यांची कोल्हापूरमधील गांधी मैदानाता जाहीर सभा होणार आहे.आज शरद पवार यांची वाई, कोरेगाव आणि फलटण येथे सभा होणार आहे. आज उद्धव ठाकरे हे डोंबिवली, कल्याण, आणि ठाण्यात जाहीर सभांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.