सार

मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्र पक्षाची यादी न आल्याने आणि एका जातीवर निवडून येणे शक्य नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज सकाळी उमेदवार आणि त्यांच्या मतदारसंघाची घोषणा जरांगे करणार होते पण अंतिम क्षणी त्यांनी माघार घेतली आहे. मनोज जरांगे यांनी माघार घेतल्यामुळे मराठा उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करतात आणि बंडखोरी कोण करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

काय म्हणाले मनोज जरांगे? - 
मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी तर काही वाढले असतील. मराठा समाजाने मतदानावर लढायचं आहे. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे एकटयाने कसं लढायचं. यावर रात्री आमची चर्चा झाली. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. 

एका जातीवर लढणं सोपं नाही - 
आम्हाला एका जातीवर शक्य नाही, ते दोन्ही पण बांधवच आहेत. ते पण नवीन आहेत आणि मी पण… काल यादी यायला पाहिजे होती पण नाही आली, मग लढायचं कसं? राज्यतल्या सर्व भावांना सांगतो सगळे जण अर्ज काढून घ्या. मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे, आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून उमेदवार देणार नाहीत. सज्जाद नोमानी यांची यादी आली नाही. निवडणूक लढवायची नाही पूर्ण पडायचे आहे. आपले अर्ज लवकर काढून घ्या, आपण कोणत्याही पक्षला पाठिंबा दिला नाही. एका जातीवर लढणं साधी सोप्पी गोष्ट नाही, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.