सार

मनोज जरांगे आज संध्याकाळी त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार असून उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. त्यांनी उमेदवार दिल्यास महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या उमेदवारांमध्ये मतांचा फरक पडण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे यांच्या राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जरांगे हे आज संध्याकाळी त्यांची राजकीय भूमिका ठरवणार असून उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी उमेदवार दिल्यावर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या उमेदवारांमध्ये मतांचा फरक पडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यववर टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय टीका केली? 
मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहे. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे १०० टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा त्यांनी केला. आम्हाला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेजार केलं म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

किती उमेदवार देणार? 
आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत भांडेल. आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. निवडून येणार्‍या जागांवर चर्चा करू. मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील. त्यावर चर्चा करू. कमीत कमी १० ते १५ आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. २०० लडून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत, असे जरांगे यांनी म्हटलं आहे.