MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • MHADA Lottery: पुणेकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाकडून ३००० घरांची नवी लॉटरी; पाहा कधी सुटणार सोडत

MHADA Lottery: पुणेकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाकडून ३००० घरांची नवी लॉटरी; पाहा कधी सुटणार सोडत

MHADA Lottery: पुणे म्हाडा मार्च महिन्यात ३,००० परवडणाऱ्या घरांची नवीन लॉटरी काढणार असल्याची घोषणा सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लॉटरीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, हुकलेल्या अर्जदारांना ही एक नवीन संधी असेल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 11 2026, 07:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पुणेकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाकडून ३००० घरांची नवी लॉटरी
Image Credit : Twitter

पुणेकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न होणार साकार! म्हाडाकडून ३००० घरांची नवी लॉटरी

पुणे : स्वतःच्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करणाऱ्या पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १० फेब्रुवारी रोजी झालेल्या भव्य सोडतीनंतर, आता पुणे म्हाडा (Pune MHADA) पुन्हा एकदा ३,००० परवडणाऱ्या घरांची नवी लॉटरी घेऊन येत आहे. म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मार्च महिन्यात ही नवीन सोडत काढली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 

26
मार्चमध्ये संधीचे सोने करण्याची संधी!
Image Credit : Twitter

मार्चमध्ये संधीचे सोने करण्याची संधी!

नुकत्याच झालेल्या ४,१८६ घरांच्या सोडतीसाठी तब्बल २.१५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. ही प्रचंड मागणी पाहता, म्हाडाने तातडीने पुढच्या लॉटरीची तयारी सुरू केली आहे. मार्च महिन्यात येणाऱ्या या लॉटरीमुळे गेल्यावेळी हुकलेल्या अर्जदारांना पुन्हा एकदा नशीब आजमावता येणार आहे. 

Related Articles

Related image1
रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज! लग्नसराई आणि गर्दीसाठी धावणार २४ 'स्पेशल' ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Related image2
Indias First Musical Road: मुंबईत देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’! कोस्टल रोडवर 80 किमी वेगात ऐका ‘जय हो’
36
म्हाडाचे 'हे' प्रकल्प आहेत पाइपलाइनमध्ये
Image Credit : Twitter

म्हाडाचे 'हे' प्रकल्प आहेत पाइपलाइनमध्ये

ताथवडे: ७५० निवासी आणि अनिवासी गाळ्यांचे काम अंतिम टप्प्यात.

शिरूर: ५७४ घरांचे बांधकाम वेगाने सुरू.

खराबवाडी: १९४ व्यापारी गाळ्यांची लवकरच उपलब्धता.

इतर ठिकाणे: म्हाळुंगे, सोलापूर, बारामती आणि पुरंदर येथेही नवीन गृहनिर्माण प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. 

46
प्रक्रिया आता अधिक सोपी आणि पारदर्शक
Image Credit : Twitter

प्रक्रिया आता अधिक सोपी आणि पारदर्शक

म्हाडाने संपूर्ण प्रक्रिया आता मानवी हस्तक्षेपाविना (Digital) केली आहे. पुणे मंडळाचे मुख्याधिकारी राहुल साकोरे यांनी स्पष्ट केले की, निवड झालेल्या लाभार्थ्यांनी IHLMS 2.0 प्रणालीवर वेळेत कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून ताबा प्रक्रिया जलद होईल. तसेच, '२० टक्के योजने'तील उर्वरित घरे 'बुक माय होम' (Book My Home) पोर्टलवर 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर मिळतील. 

56
तक्रारींची दखल; बिल्डरांना दणका!
Image Credit : our own

तक्रारींची दखल; बिल्डरांना दणका!

काही प्रकल्पांमध्ये २० टक्के योजनेतील घरांसाठी जादा पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यावर म्हाडाने कठोर भूमिका घेत वाढीव शुल्क रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लाभार्थ्यांना ५० टक्के पार्किंग देणे आता बिल्डरांना बंधनकारक करण्यात आले आहे. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : our own

महत्त्वाची टीप

चंदनगर-खराडी येथील अतिक्रमित जमीन म्हाडाने ताब्यात घेतली असून, तिथेही लवकरच नवीन गृहप्रकल्प उभारण्याचे संकेत दिले आहेत.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Weather Alert: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! कुठे पावसाचा कडकडाट तर कुठे उष्णतेची लाट; १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
Recommended image2
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! १ जानेवारी २०११ पूर्वीची १५०० चौ. फुटांपर्यंतची घरे होणार नियमित
Recommended image3
Ashok Kharat Case : ‘अंकशास्त्रज्ञ’ अशोक खरात गणितात नापास! शैक्षणिक वास्तव समोर आल्याने चर्चांना उधाण
Recommended image4
Pimpri Chinchwad Traffic Advisory : रामनवमी उत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक निर्बंध; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा
Recommended image5
Ashok Kharat Case : महाराष्ट्राचा 'एपस्टीन'! विद्यार्थिनी, गर्भवती महिलांना बनवलं शिकार; अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे
Related Stories
Recommended image1
रेल्वे प्रवाशांना गुड न्यूज! लग्नसराई आणि गर्दीसाठी धावणार २४ 'स्पेशल' ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक
Recommended image2
Indias First Musical Road: मुंबईत देशातील पहिला ‘म्युझिकल रोड’! कोस्टल रोडवर 80 किमी वेगात ऐका ‘जय हो’
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved