- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: दिवाळी पाडव्याला कुठं उकाडा, कुठं मुसळधार पाऊस! महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट
Maharashtra Rain Alert: दिवाळी पाडव्याला कुठं उकाडा, कुठं मुसळधार पाऊस! महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट
Maharashtra Diwali Rain Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात आगामी काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २۲ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला.

राज्यातील १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट
मुंबई: दिवाळीचा सण जवळ आला असतानाच राज्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आगामी तीन ते चार दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light rainfall, gusty winds with speed reaching 30-40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa, Madhya Maharashtra and Marathwada .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 21, 2025
२२ ऑक्टोबरला ‘या’ १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्याने २२ ऑक्टोबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस कोसळण्याचा इशारा दिला गेला आहे. यामुळे पिके घेतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विदर्भालाही पावसाचा फटका
विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाला 'ब्रेक'
उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, थंडीचा सुरुवातीचा प्रभाव जाणवू शकतो.
शेतकऱ्यांसाठी हवामानाचा इशारा
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात सध्या पाऊस पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे आणि योग्य ती संरक्षणाची उपाययोजना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

