भाजप आमदार नितेश राणे यांनी मतदान केले आहे. त्यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातून मतदान केले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Voting: संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान
;Resize=(380,220))
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ एका टप्यात होणार आहे. २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच टप्यात आज मतदार मतदान करणार आहेत.
- FB
- TW
- Linkdin
भाजप उमेदवार नितेश राणे यांनी केले मतदान
अभिनेता शक्ती कपूरने केले मतदान
अभिनेता शक्ती कपूरने मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
कुडाळ विधानसभा
कुडाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नितेश राणे यांनी मतदान केले आहे.
शाहरुख खान यांनी केले मतदान
शाहरुख खान यांनी कुटुंबासोबत मतदान केले आहे.
मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन नीता अंबानी यांनी केले मतदान
मुंबईतील मतदान केंद्रावर जाऊन नीता अंबानी यांनी मतदान केले आहे.
सलमान खान
सलमान खानने मतदानाचा हक्क बजावला आहे.
महाराष्ट्र रेकॉर्ड 45.53
महाराष्ट्र रेकॉर्ड ४५.५३ टक्के मतदान पूर्ण झाले आहे.
सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला
सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे, मुंबईमधील मतदानाच्या केंद्रावर त्याने मतदान केलं आहे
मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला
मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला
अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे.
बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी
मतदान केंद्रा बाहेर तणाव पोलीस बंदोबस्त वाढवला..
बीडचा केज विधानसभा मतदारसंघात विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.. मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून ही हनामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.. पोलिसांनी मध्यस्थी केली.. तसेच मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
सैफ अली खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे, मुंबईमधील मतदानाच्या केंद्रावर त्याने मतदान केलं आहे
मुकेश अंबानी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
अरबाज खान याने मतदानाचा हक्क बजावला आहे.
संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा, व्हिडीओ ट्विट करत आरोप
अंबादास दानवे यांच्याकडून संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडीओ ट्विट, संजय शिरसाट शिव्या देत असल्याचा अंबादास दानवेंचा दावा. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील प्रकार समोर.
ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल
ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांच्या तक्रारीनंतर दिघेंवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे आहेत.
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोलीत ५०.८९ टक्के मतदान
सर्वात कमी मतदान मुंबई शहरात
मुंबई शहरात फक्त २७.७३ टक्के मतदान
बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड
शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड केली आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.
बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड
शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड केली आहे. राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
अहमदनगर - ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड - ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया - ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव - २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.