- Home
- Maharashtra
- मध्य रेल्वेवर मोठा अडथळा! 11 दिवसांचा विशेष ब्लॉक; डेक्कन–कोयनासह 15 गाड्यांचे बदलले वेळापत्रक
मध्य रेल्वेवर मोठा अडथळा! 11 दिवसांचा विशेष ब्लॉक; डेक्कन–कोयनासह 15 गाड्यांचे बदलले वेळापत्रक
मध्य रेल्वेने लोणावळा स्टेशनवरील यार्ड आधुनिकीकरणासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान 11 दिवसांचा विशेष ब्लॉक जाहीर केला. या कामामुळे कर्जत, भिवपुरी रोड दरम्यानची रेल्वे वाहतूक प्रभावित होणार असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झालाय.

मध्य रेल्वेवर तब्बल 11 दिवसांचा विशेष ब्लॉक
मुंबई: लोणावळा रेल्वे स्थानकातील यार्डचे आधुनिकीकरण आणि नवीन मार्गिकांच्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने तब्बल 11 दिवसांचा विशेष ब्लॉक लागू केला आहे. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या काळात दररोज सकाळी 11.25 ते सायंकाळी 6.26 या वेळेत महत्त्वाची कामे करण्यात येणार असल्याने लोणावळा, कर्जत आणि भिवपुरी रोडदरम्यान गाड्यांची नियमित वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे.
लोणावळा यार्डमधील डाउन यार्डमध्ये तीन आणि अप यार्डमध्ये पाच मार्गिकांचा विस्तार
या कालावधीत लोणावळा यार्डमधील डाउन यार्डमध्ये तीन आणि अप यार्डमध्ये पाच मार्गिकांचा विस्तार, तसेच अतिरिक्त मार्गिकांवरील सिग्नल प्रणालीचे ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटरलॉकिंग’ काम करण्यात येईल. परिणामी अनेक मेल–एक्स्प्रेस गाड्या मर्यादित गतीने धावणार असून, डेक्कन एक्स्प्रेससह 15 गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
28 आणि 29 नोव्हेंबर, या गाड्या विलंबाने धावणार
पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस (11008) : 1 तास 15 मिनिटे
पुणे–सीएसएमटी इंटरसिटी (12128) : 15 मिनिटे
पुणे–सीएसएमटी इंद्रायणी (22106) : 15 मिनिटे
दौंड–इंदौर (22943) : 1 तास
कोल्हापूर–सीएसएमटी कोयना (11030) : 40 मिनिटे
बंगळुरू–सीएसएमटी उद्यान (11302) : 30 मिनिटे
नागरकोइल–सीएसएमटी (16352) : 1 तास 30 मिनिटे (फक्त 28 नोव्हेंबर)
सीएसएमटी–चेन्नई (22159) : 10 मिनिटे
मदुराई–एलटीटी (22102) : 15 मिनिटे (फक्त 29 नोव्हेंबर)
26 आणि 27 नोव्हेंबर, खालील एक्स्प्रेस गाड्यांना उशीर
जोधपूर–हडपसर (20945) : 45 मिनिटे
सीएसएमटी–चेन्नई (22159) : 1 तास
एलटीटी–मदुराई (22101) : 10 मिनिटे
सीएसएमटी–भुवनेश्वर कोणार्क (11019) : 15 मिनिटे
सीएसएमटी–हैदराबाद (22732) : 15 मिनिटे
एलटीटी–काकीनाडा (17222) : 10 मिनिटे
भविष्यात गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होणार
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी नियोजन करण्याचे, तसेच या कालावधीत स्टेशनवर वेळेपूर्वी पोहोचण्याचे आवाहन केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गिकांची संख्या वाढून भविष्यात गाड्यांची वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

