Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 258 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, जाणून घ्या मतदानाची तारीख

| Published : Apr 23 2024, 11:46 AM IST / Updated: Apr 23 2024, 11:55 AM IST

voting 01.jpg

सार

Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काही मतदारसंघात नुकतेच मतदान पार पडले. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 258 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 11 मतदारसंघातील उमेदवारांच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशातच 317 उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने माहिती देत म्हटले की, 258 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. कारण काही उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी माघार घेतली आहे.

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान कधी?
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 मतदारसंघातून 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. अर्जांची तपासणी केल्यानंतर केवळ 317 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याची माहिती निवडणूक पदाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बारामती-46, उस्मानाबाद- 35, लातूर- 31, सोलापूर- 32, माढा- 38, सांगली- 25, सातारा- 21, रत्नागिरी-सिंधुदुर्ग- 9, कोल्हापूर- 27 आणि हातकणंगले मतदारसंघ असे एकूण मिळून 317 उमेदवारांचे 32 अर्ज मान्य केले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदावारांची संख्या

  • रायगड - 13
  • बारामती - 38
  • उस्मानाबाद - 31
  • लातूर - 28
  • सोलापूर - 21
  • माढा - 32
  • सांगली - 20
  • सातारा - 16
  • रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 9
  • कोल्हापूर - 23
  • हातकणंगले - 27

मतदारांना 23 एप्रिलपर्यंत मतदान यादीत नाव दाखल करता येणार
मुंबईतील ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीत रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांना 23 एप्रिलपर्यंत मतदार यादीमध्ये नाव दाखल करता येणार आहे. याशिवाय बेघर, तृतीय पंथी, भटक्या जाती-जमातीमधील व्यक्तींना पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायेच असल्यास त्यांना 23 एप्रिलपर्यंत कोणत्याही ओखळ पत्राशिवाय स्व-घोषणेच्या माध्यमातून आपले नाव मतदार यादीत दाखल करता येणार आहे. याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी माहिती दिली आहे.

आणखी वाचा : 

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका, अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार माजी आमदार

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंनी घेतलेय सुनेत्रा पवारांकडून एवढ्या लाखांचे कर्ज, बारामतीत एकमेकांविरुद्ध लढणार

 

Read more Articles on