Lok Sabha Election 2024 : भाजपकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर, अमरावतीमधून तिकीट दिलेल्या नवनीत राणा कोण?

| Published : Mar 28 2024, 07:41 AM IST / Updated: Mar 28 2024, 07:44 AM IST

Mp Navneet Kaur Rana
Lok Sabha Election 2024 : भाजपकडून उमेदवारांची सातवी यादी जाहीर, अमरावतीमधून तिकीट दिलेल्या नवनीत राणा कोण?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने अपक्ष खासदार नवनीत राणा यांना अमरातवती येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच भाजपने (BJP) उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमरावती जागेवरून (Amravati Seat) खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांना तिकीट दिले आहे. याशिवाय कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून दोविंद करजोल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

कोण आहेत नवनीत राणा?
नवनीत राणा अमरावती येथील अपक्ष खासदार होत्या. पण आता नवनीत राणा यांनी भाजपात एण्ट्री केली आहे. वर्ष 2019 मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला होता. याशिवाय राणा भाजप समर्थक राहिल्या आहेत.

एप्रिल, 2022 मध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्यावेळी नवनीत राणा आणि त्यांचे पत्नी यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या प्रकरणात अटकही केली होती. याशिवाय राणा यांच्यावर वेगवेगळ्या समूहांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे आरोपही लावण्यात आले होते.

भाजपकडून 407 उमेदवारांची घोषणा
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (26 मार्च) आपल्या तीन उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली होती. यानंतर सातवी यादी जाहीर करत त्यात 407 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने 101 खासदारांना पत्ता कट केलाय. महाराष्ट्रात भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटासोबत मिळून निवडणूक लढणार आहेत. दरम्यान, जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये अद्याप तिढा सुरू आहे.

विधानसभेसाठी भाजपने उतरवले उमेदवार
भाजप आंध्र प्रदेशात टीडीपीसोबत मिळून निवडणूक लढणार आहे. याशिवाय युतीमुळे भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. पक्षाने 10 विधानसभा जागांसाठी आपले उमेदवार उतरवले आहेत. याशिवाय हरियाणा येथील करनाल जागेवरून मनोहर लाल खट्टर यांनी राजानीमा दिल्यानंतर पोटनिवडणुक होणार आहे. या जागेसाठी मुख्ममंत्री नायब सिंह सैनी पोटनिवडणुक लढणार आहेत.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समोर आली ही नावे

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात भाजपला 41 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, अमित शाह यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा दौंड ते यवतपर्यंत लोकल ट्रेनने प्रवास, जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

Read more Articles on