उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पवार यांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. यावेळी अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबाचे व्यक्तिगत चांगले संबंध होते असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आम्ही अनेकदा एकत्र वेळ घालवला असल्याचं सांगितलंय.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस

महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस आहे. त्यांच्याशिवाय हे राजकारण बेचव असल्याचं राऊत यांनी पुढं म्हटलं आहे. त्यांचा मृत्यू योगायोग असल्याचं यावेळी सांगितलं आहे. सच्चा आणि शिस्तप्रिय नेता गेला असल्याचं यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यांनी आम्ही ज्यांच्या जीवावर राजकारण करायचो तीच व्यक्ती सोडून गेल्याच दुःख व्यक्त केलंय.

जे व्हायचं ते काम करणारा नेता महाराष्ट्रानं गमावला 

जे होणार ते काम करायचं, जे होणार नाही ते स्पष्ट सांगायचं असं अजित पवार यांचं नेतृत्व होत अशी भावना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनी मोठं काम केल्याचं म्हटलं होत. अजित पवार हे कामाशी काम ठेवणारे एक व्यक्ती होते. पवार कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दुःख

श्री अजित पवार जी हे जनतेचे नेते होते, ज्यांचा तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध होता. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात अग्रेसर असलेले एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचित लोकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती.