टाटाने केली XPRES कार लाँच, पेट्रोल+CNG व्हेरिएंटची किंमत खूपच कमी, चांगली ऑफर
टाटा मोटर्सने फ्लीट ग्राहकांसाठी नवीन XPRES कार लाँच केली आहे. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध असलेली ही कार कमी खर्चात जास्त उपयोगिता देण्याच्या उद्देशाने डिझाइन केली आहे.

टाटा फ्लीट सेडान
टाटा मोटर्सने भारतात आपली नवीन XPRES कार लाँच केली आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये आलेली ही कार विशेषतः टॅक्सी/फ्लीट वापरणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बनवली आहे. कमी खर्चात जास्त उपयोगिता मिळावी, असे टाटाचे नियोजन आहे.
टाटा टॅक्सी
या नवीन XPRES द्वारे टाटाने आपला पर्पज-बिल्ट फ्लीट पोर्टफोलिओ आणखी वाढवला आहे. पूर्वी लोकप्रिय झालेल्या XPRES EV प्रमाणेच, आता पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल्सनेही मोठी बाजारपेठ गाठावी हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे टाटाची मल्टी-पॉवरट्रेन रणनीती अधिक मजबूत होईल.
टाटा XPRES किंमत
XPRES पेट्रोल व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹5.59 लाख आणि सीएनजी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ₹6.59 लाख ठेवण्यात आली आहे. या मॉडेलसाठी बुकिंग आता देशभरातील टाटाच्या अधिकृत फ्लीट डीलरशिपवर सुरू झाली आहे. या कारमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन देण्यात आले आहे.
टाटा XPRES पेट्रोल मॉडेल
हे मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. दररोज जास्त किलोमीटर चालवणाऱ्या फ्लीट वापरकर्त्यांसाठी विश्वसनीयता, टिकाऊपणा आणि कमी देखभाल खर्चावर भर देण्यात आला आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, XPRES सीएनजी मॉडेलमध्ये 70-लिटरची ड्युअल-सिलेंडर सीएनजी टाकी देण्यात आली आहे.
टाटा XPRES CNG मॉडेल
टाटाच्या मते, या सेगमेंटमध्ये ही सुविधा पहिल्यांदाच देण्यात आली आहे. यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज कमी होईल. तसेच, स्मार्ट पॅकेजिंगमुळे बूट स्पेस कमी न होता पूर्ण मिळते. पेट्रोल मॉडेलमध्ये 419 लिटरची बूट स्पेस असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

