- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana New Rule: लाडकी बहीण योजनेतून तुम्हालाही वगळलं जाणार का?, सरकारने लागू केला नवा नियम; वाचा सविस्तर!
Ladki Bahin Yojana New Rule: लाडकी बहीण योजनेतून तुम्हालाही वगळलं जाणार का?, सरकारने लागू केला नवा नियम; वाचा सविस्तर!
Ladki Bahin Yojana: सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू केले, ज्यामुळे बोगस लाभार्थ्यांना वगळले जात आहे. आता लाभार्थी महिलेसोबत पती, वडिलांचे उत्पन्नही तपासले जाणारय, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास महिला अपात्र ठरेल.

सरकारने बोगस लाभार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलायला केली सुरुवात
मुंबई: राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने सुरू केलेली "लाडकी बहीण योजना" सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीत या योजनेने मोठी भूमिका बजावली होती, मात्र आता सरकारसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. योजनेचा खर्च प्रचंड वाढल्यामुळे सरकारने बोगस लाभार्थ्यांविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे.
बदललेले निकष, आता पती किंवा वडिलांचंही उत्पन्न तपासलं जाणार!
पूर्वी केवळ महिलांचं उत्पन्न पाहून त्या योजनेसाठी पात्र ठरत होत्या. मात्र आता सरकारने एक महत्त्वपूर्ण नवा नियम लागू केला आहे.
लाभार्थी महिलेसोबत पती किंवा वडिलांचीही ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.
अविवाहित महिलांच्या बाबतीत वडिलांचे, तर विवाहित महिलांच्या बाबतीत पतीचे वार्षिक उत्पन्न तपासलं जाईल.
जर एकूण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरेल.
सरकारची कारवाई, लाखो अपात्र महिलांना योजनेतून वगळलं
निवडणुकीत योजनेच्या निकषांकडे दुर्लक्ष करून लाखो महिलांना लाभ देण्यात आला. पण आता तिजोरीवरील ताण लक्षात घेता सरकारने निकषांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे लाखो महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे, आणि अजूनही ही छाननी प्रक्रिया सुरू आहे.
घरबसल्या करा ई-केवायसी, एक सोपी प्रक्रिया
योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
https://ladakibahin.maharashtra.gov.in
e-KYC बॅनरवर क्लिक करा.
आधार क्रमांक व कॅप्चा टाकून Send OTP वर क्लिक करा.
मोबाईलवर आलेला OTP भरून Submit करा.
जर ई-केवायसी आधीच पूर्ण असेल, तर यासंदर्भातील मेसेज दिसेल.
पुढील टप्प्यात पती/वडिलांचा आधार क्रमांक, कॅप्चा आणि OTP वापरून त्यांचीही ई-केवायसी पूर्ण करा.
निकषांची कठोर अंमलबजावणी सुरू
आता केवळ महिलांचं नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्नही महत्त्वाचं.
उत्पन्न अटी कठोरपणे तपासल्या जात आहेत.
बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारची मोहीम सुरू.
लाभ हुकवू नये, म्हणून तात्काळ ई-केवायसी पूर्ण करा.

