- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: ई-KYC करताना OTP चा त्रास? अदिती तटकरे यांनी दिलं स्पष्टीकरण!, नेमकं काय म्हणाल्या?
Ladki Bahin Yojana: ई-KYC करताना OTP चा त्रास? अदिती तटकरे यांनी दिलं स्पष्टीकरण!, नेमकं काय म्हणाल्या?
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC अनिवार्य झाले, परंतु अनेक महिलांना OTP न मिळण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या तांत्रिक अडचणीवर महिला व बालविकास विभाग काम करत असून, मंत्री अदिती तटकरे लवकरच ही प्रक्रिया सुलभ करणार आहेत.

लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना OTP येत नाही?
मुंबई: राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी महिलांसाठी आता ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेमध्ये विशेषतः OTP न मिळण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. त्यामुळे अनेक महिलांना E-KYC करताना त्रास सहन करावा लागत आहे.
काय आहे लाडकी बहीण योजना?
महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा आर्थिक मदत पुरवणे. योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र, काही ठिकाणी फसवणुकीचे प्रकार उघडकीस आल्याने सरकारने आता सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे.
OTP अडचण आणि तांत्रिक समस्या
E-KYC प्रक्रियेचा भाग म्हणून लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि मोबाईल OTP टाकून प्रमाणीकरण करायचं असतं. पण अनेकांना OTP वेळेवर मिळत नाही किंवा तो येतच नाही, अशी तक्रार मोठ्या प्रमाणावर आहे.
मंत्री अदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण
या तांत्रिक अडचणीची दखल घेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं की, “ई-केवायसी करताना OTP बाबत काही अडचणी असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. महिला व बालविकास विभागाकडून यावर काम सुरू आहे. तज्ज्ञांच्या मदतीने लवकरच ही समस्या सोडवली जाईल. सर्व लाडक्या बहिणींना मी खात्री देते की ही प्रक्रिया लवकरच अधिक सुलभ आणि सोपी होईल.”
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण…— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 3, 2025
E-KYC कशी करावी? (Step-by-step मार्गदर्शन)
https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक करा.
उघडलेल्या फॉर्ममध्ये आधार क्रमांक आणि Captcha Code टाका.
Send OTP बटणावर क्लिक करा.
आधार-लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
जर KYC आधीच झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
महत्वाची सूचना
E-KYC करताना मोबाईल नेटवर्क, इंटरनेट स्पीड, आणि मोबाइलमध्ये DND सेवा सुरू नसेल याची खात्री करा. OTP अडचणीसाठी पोर्टलवरच्या हेल्पलाइनचा वापर करता येईल.

