- Home
- Maharashtra
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ‘हे’ तात्काळ करा, नाहीतर बंद होतील तुम्हाला मिळणारे पैसे
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ‘हे’ तात्काळ करा, नाहीतर बंद होतील तुम्हाला मिळणारे पैसे
Ladki Bahin Yojana: राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी e-KYC अनिवार्य केले आहे. लाभार्थ्यांनी ₹1500 चे मासिक सहाय्य सुरू ठेवण्यासाठी पुढील 2 महिन्यांत अधिकृत पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा लाभ थांबू शकतो.

प्रत्येक लाभार्थ्यासाठी e-KYC अनिवार्य
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यासाठी e-KYC अनिवार्य केले आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरद्वारे याबाबत घोषणा केली आहे.
त्यांच्या मते, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सर्व पात्र भगिनींनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. हे काम पुढील 2 महिन्यांच्या आत न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.”
e-KYC का करणे गरजेचे?
योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी
पात्र महिलांना नियमित लाभ मिळत राहण्यासाठी
भविष्यातील इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी
ही सुविधा https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर असून, फक्त आधार क्रमांकाद्वारे पडताळणी केली जाईल.
वेळेत KYC न केल्यास काय होईल?
सरकारच्या परिपत्रकानुसार, येत्या 2 महिन्यांच्या आत जर लाभार्थी महिलांनी e-KYC केली नाही, तर त्यांचा लाभ थांबू शकतो. याचा थेट परिणाम म्हणून दर महिन्याला मिळणारे ₹1500 चे आर्थिक सहाय्य बंद होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या अंतराळात e-KYC करणे अनिवार्य असेल.
लाभार्थींनी काय करावे?
दिलेल्या कालावधीत e-KYC पूर्ण करणे
आधार क्रमांक व इतर आवश्यक माहिती तयार ठेवणे
ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलवर लॉग इन करून प्रक्रिया पूर्ण करणे
e-KYC ही फक्त औपचारिकता नसून लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण आहे
सरकारने स्पष्ट केले आहे की, e-KYC ही फक्त औपचारिकता नसून यातून लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण होऊन योजनेंतर्गत कोणतीही गैरव्यवस्था होणार नाही.

