सार
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी भाजप आणि आरएसएसची तुलना 'विषारी सापाशी' केली आणि त्यांना भारतातील 'राजकीयदृष्ट्या अत्यंत धोकादायक' असे संबोधले.
सांगली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी भाजप आणि आरएसएसची तुलना 'विषारी सापाशी' केली आणि त्यांना भारतातील 'राजकीयदृष्ट्या अत्यंत धोकादायक' असे संबोधले.
सांगली येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीत बोलताना ते म्हणाले, 'भारतात राजकीयदृष्ट्या सर्वात धोकादायक काही असेल तर ते भाजप आणि आरएसएस आहे. ते विषासारखे आहेत. साप चावला तर (चावलेला व्यक्ती) मरतो. अशा विषारी सापाला मारले पाहिजे,' असे खर्गे म्हणाले.
आज प्रचाराची सांगता:
२० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सोमवारी संध्याकाळी होणार आहे. राज्यात महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत आहे. महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार प्रचार केला आहे. तर आघाडीसाठी मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रियांका वाद्रा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी प्रचार केला आहे.
खोटा व्हिडिओ हटवा: भाजपला आयोगाचे निर्देश
पीटीआय रांची, झारखंड भाजपने विधानसभा निवडणुकीसंदर्भात पोस्ट केलेला वादग्रस्त सोशल मीडिया व्हिडिओ हटवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.भाजपने दिशाभूल करणारा खोटा व्हिडिओ पोस्ट केल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. त्यानुसार आयोगाने ही कारवाई केली आहे.